शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर २६ जूनला धरणे

By admin | Updated: June 18, 2014 00:54 IST

टोलचा प्रश्न : सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचा निर्णय

कोल्हापूर : टोलविरोधातील लढाई ही कोल्हापूरच्या अस्मितेची व स्वाभिमानाची लढाई असून, त्याची जाणीव राज्य सरकारला करून देण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कऱ्हाड येथील निवासस्थानी एक दिवसाचे लाक्षणिक धरणे धरण्याचा निर्णय आज, मंगळवारी येथे सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीतर्फे घेण्यात आला. अन्यायग्रस्त जनतेला ज्यांनी स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला, त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीदिवशी म्हणजे २६ जून रोजी हे धरणे धरण्यात येणार आहे.आज सायंकाळी येथील हिंदू एकता पक्षाच्या कार्यालयात कृती समितीची बैठक निवासराव साळोखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूर शहरात आयआरबी कंपनीने टोलवसुली सुरू केली असून त्याच्याविरोधात गेल्या चार वर्षांपासून कोल्हापूरकरांनी आंदोलन छेडले आहे. तरीही सरकार टोल रद्द करण्याचा निर्णय घेत नाही. म्हणून आता राज्यकर्त्यांना तसा निर्णय घेण्यास भाग पाडण्याकरिता मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कऱ्हाड येथील निवासस्थानासमोर धरणे धरण्याचा आग्रह मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी धरला, त्यावेळी सर्वांनी तो तत्काळ मान्य केला. शाहू जयंतीदिवशी दसरा चौक येथे पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घातल्यानंतर सर्व आंदोलक विविध वाहनांतून कऱ्हाड येथे मुख्यमंत्री चव्हाण यांच्या घरासमोर जाऊन धरणे धरतील. ज्यांना या धरणे आंदोलनात भाग घ्यायचा आहे, त्यांनी कृती समितीकडे नावनोंदणी करावी, असे आवाहन साळोखे यांनी केले. या आंदोलनात कॉँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजप-शिवसेना पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही सहभागी व्हावे आणि कोल्हापूरकरांच्या एकजुटीचे दर्शन घडवावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.