शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

ध्यानचंद चषक ‘तिरंगा’कड

By admin | Updated: November 2, 2014 23:53 IST

महिला हॉकी स्पर्धा : अंतिम सामन्यात ज्योतिर्लिंग क्रीडा मंडळावर माते

कोल्हापूर : जिल्हा महिला हॉकी संघटनेच्यावतीने घेण्यात आलेल्या मेजर ध्यानचंद स्मृती चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तिरंगा क्रीडा मंडळ, नूल (ता. गडहिंग्लज)ने ज्योतिर्लिंग क्रीडा मंडळ (वडणगे-निगवे)चा २-० असा पराभव करत अजिंक्यपद पटकावले. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे आज, रविवारी झालेल्या या सामन्यात तिरंगा क्रीडा मंडळ व ज्योतिर्लिंग क्रीडा मंडळाच्या खेळाडूंना पूर्वार्धात व उत्तरार्धात अनुक्रमे चार व सहा शॉर्टकॉर्नर मिळूनसुद्धा त्याचा फायदा घेता आला नाही. त्यामुळे पूर्ण वेळेत सामना बरोबरीत राहिला. अखेर पंचांनी सामन्याचा निकाल पेनल्टी स्ट्रोकवर घेण्याचा निर्णय घेतला. हा सामना पेनल्टी स्ट्रोकवर तिरंगा क्रीडा मंडळाने २-० असा जिंकला. सामन्यात तिरंगाकडून प्रीती माने, अश्विनी कुरळे, कावेरी चव्हाण, तर ज्योतिर्लिंगकडून रोहिणी पाटील, प्राजक्ता किडगावकर, श्वेता हरणे, अलकनंदा बागडे, अंकित शेलार, गौरी शिंदे यांनी उत्कृष्ट खेळ केला. स्पर्धेचा बक्षीस समारंभ हॉकी महाराष्ट्रच्या उपाध्यक्षा सुरेखा पाटील व जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष विजय साळोखे यांच्या हस्ते झाले. यावेळी निवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी एस. आर. जाधव, जिल्हा महिला हॉकी संघटनेच्या उपाध्यक्षा कल्पना भोसले, कविता साळोखे, न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य डी. एस. चव्हाण, क्रीडा अधिकारी उदय पोवार, रमेश चौगुले, मनोहर मांगलेकर, महेश सूर्यवंशी, अमोल थोरवत, हॉकी प्रशिक्षक मोहन भांडवले, सागर जाधव, सुहास पाटील, आदी उपस्थित होते. मेजर ध्यानचंद स्मृती चषक पटकाविणाऱ्या तिरंगा क्रीडा मंडळाच्या महिला संघासोबत सुरेखा पाटील, विजय साळोखे, एस. आर. जाधव, कल्पना भोसले, कविता साळोखे, प्राचार्य डी. एस. चव्हाण, क्रीडा अधिकारी उदय पोवार, रमेश चौगुले, मनोहर मांगलेकर, महेश सूर्यवंशी, अमोल थोरवत, हॉकी प्रशिक्षक मोहन भांडवले, सागर जाधव, सुहास पाटील, आदी उपस्थित होते