शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

रानमेव्याच्या मार्केटिंगमध्ये धनगर महिलांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:17 IST

आंबा : ‘रानचा मेवा कुणी बी खावा’ अशी आरोळी देत करवंद, जांभळे विक्री करणारा धनगर समाज एप्रिल व मे ...

आंबा : ‘रानचा मेवा कुणी बी खावा’ अशी आरोळी देत करवंद, जांभळे विक्री करणारा धनगर समाज एप्रिल व मे महिन्यांत कुटुंबासह उदरनिर्वाहासाठी म्हणून हा व्यवसाय करतो. कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरील शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, आजरा, चंदगड या डोंगराळ भागात पिढ्यान्पिढ्या वास्तव्य केलेला धनगर समाज जंगलातील करवंद, जांभळे, तोरणे, आळू, फणस , शिकेकाई यांची विक्री करून वर्षभराच्या पोटाची बेगमी करण्यात दिवसरात्र एक करतो.तहान-भूक विसरून चिकाटीने ग्राहकांना रानमेवा पुरवितात. शिकलेला तरुण नोकरीसाठी मुंबई गाठतो. मात्र, येथे राहणाऱ्या महिला रानमेव्याच्या सुगीत भल्या पहाटेडोंगर गाठून ३-४ किलोमीटरची पायपीटकरून २० ते २५ किलोचा रानमेवा जमवतात. करवंदागणिक काट्यांचे बोच सोसत ऊन डोक्यावर येण्यापूर्वी शेजारच्या बाजारात विक्रीसाठी दाखल होतात. पुरुष मंडळी ७० ते ८० किलोमीटरचा प्रवास करून कोल्हापूर, इस्लामपूर, सांगली, वडगावसारख्या शहरात डोक्यावर पाटी घेऊन घरोघरी रानमेवा विकतात. शहरातून परतणारी मंडळी मध्यरात्रीनंतर घरात विसावतात. बहुतेक वाड्यांवर नेमके या सुगीत पाणीटंचाई डोके वर काढते. त्यामुळे पाण्यासाठी रात्रीची झºयाकडे पायपीट करावी लागत असल्याची खंत बोरमाळच्या बजाबाई कोकरे यांनी व्यक्त केली. रानमेवा सुगी वगळता काही मंडळी तवे, पत्र्याच्या पाट्या विकण्याचा व्यवसाय करतात.गेल्या दोन दशकांत वणवे, प्लॉटिंगमुळे रानमेव्याची झाडे कमी झाली आहेत. महामार्ग रुंदीकरणात गावठी आंबे, फणस, जांभूळ यांची तोड झाल्याने पाटीभर रानमेवा जमवण्यास ३ ते ४ किलोमीटरची पायपीट करावी लागते, असे बोरमाळ येथील सिंधू लांबोर यांनी स्पष्ट केले. पिढ्यान्पिढ्या हा हंगामी व्यवसाय चालतो. वर्षांनुवर्षे झाडे कमी होत असल्याने पन्नास टक्क्यांवर हा व्यवसाय घटल्याचे ग्रा.पं. सदस्या नंदा कोळा पटे यांनी सांगितले.