शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

‘जन-धन’मध्ये कधी येणार 'धन'

By admin | Updated: November 25, 2014 23:56 IST

विम्याचा लाभ गुलदस्त्यात : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनकडून बँकांना नाहीत मार्गदर्शक सूचना

संदीप खवळे - कोल्हापूर -सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग कक्षेत आणण्यासाठी मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या ‘पंतप्रधान जन-धन योजनें’तर्गत बँक खाती उघडून साडेतीन महिने होत आले तरी, अपघाती विम्याच्या प्रक्रियेबाबत बँकांना कोणत्याही मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत़ शून्य बॅलेन्सवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेला प्रतिसाद मिळण्यासाठी मोदी सरकारने अपघाती विमा संरक्षणाचे गाजर दाखविले होते़ अपघाती विम्याचा हप्ता सरकारच्यावतीने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन भरणार आहे, पण या कॉर्पोरेशनकडून बँकांना तसेच संबंधित विमा कंपन्यांना अपघाती विम्याच्या अदायगीबाबत कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत़ त्यामुळे जन-धन योजनेंतर्गत खाते उघडलेल्या एखाद्या खातेधारकाचा अपघात झाल्यास तूर्तास तरी त्याला जन-धन योजनेचा लाभ मिळणार नाही़ जन-धन योजनेंतर्गत १५ आॅगस्ट २०१४ पासून शून्य बॅलेन्सवर खाती उघडण्याची प्रक्रिया देशभरात राबविण्यात आली़ या योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील लीड बँकेच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व बँकांत आॅक्टोबरअखेर ९५,०९१ खाती उघडण्यात आली आहेत़ त्यातील ६३,४३८ खाती ग्रामीण भागातील आहेत़ संपुआ सरकारच्या काळातही बँकेच्या प्रवाहात नसलेल्या नागरिकांना बँकिंग प्रवाहात आणण्यासाठी आर्थिक समावेशन योजना गेल्या चार वर्षांपासून राबविण्यात येत आहे़ जन-धन योजनेचा उद्देशही तोच आहे़ एक लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण, तीस हजार रुपयांचा जीवन विमा, पाच हजार रुपयांचा ओव्हर ड्राफ्ट हे लाभ या योजनेत समाविष्ट आहेत़ जन-धन योजनेंतर्गत खाती उघडण्याची सुरुवात १५ आॅगस्टला करण्यात आली़ कोल्हापूर जिल्ह्यातूनही या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला, पण खाती उघडून साडेतीन महिने होत आले तरी, अपघाती विम्याबाबत कोणतीही सूचना बँकांना प्राप्त झालेली नाही़ अपघात विम्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडिया सरकारच्यावतीने खातेधारकांचे हप्ते भरणार आहे़ बँकांकडील खाती कोणत्या विमा कंपन्यांशी जोडायची याचीच प्रक्रिया सुरू आहे़ त्यामुळे सद्य:स्थितीत एखाद्या खातेधारकांचा अपघात झाला, तर त्याला जन-धन योजनेखाली एक लाख रुपयांचा अपघाती विमा मिळणार नाही, असेच चित्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली़ खातेदाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याला मात्र जन-धन योजनेतील ३० हजार रुपये विमा रक्कम मिळणार आहे़ या विम्याची रक्कम एलआयसी भरणार आहे़ त्यासाठी एलआयसी आपल्याकडील राखीव असलेल्या शंभर कोटी रुपयांचा राखीव निधी वापरणार आहे़ याबाबत शासनाने एलआयसीला मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्याची आठ दिवसांत अंमलबजावणी होणार आहे़ विम्याचा लाभ मिळण्यासाठी...अपघाती विमा संरक्षण योजनेचा लाभ मिळविण्यासाठी खातेदाराला ४५ दिवसांनी खात्यावरून व्यवहार करावे लागणार आहेत. तसेच रूपे कार्डाचा वापर आवश्यक आहे़ रूपे कार्ड नसल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच सहा महिने खात्यावर काही व्यवहार करावे लागणार आहेत़पंतप्रधान जन-धन विमा योजनेंतर्गत एक लाख रुपयाच्या अपघाती विमा संरक्षणाच्या प्रक्रियेबाबत अद्यापही कोणत्याही मार्गदर्शक सूचना बँकांना प्राप्त झालेल्या नाहीत़ अपघाती विम्याच्या रकमेचा हप्ता विमा कंपन्यांना देण्याची जबाबदारी शासनाने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनकडे सोपविली आहे - एम़ जी़ कुलकर्णी, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, बँक आॅफ इंडिया जिल्ह्यातील जन-धनची स्थिती९५,०९१ लीड बँकेच्या अखत्यारितील खाती६३,४३८ ग्रामीण भागातील खाती