शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

‘जनसुराज्य’, ‘स्वाभिमानी’ पक्षांची मान्यता टिकविण्यासाठी धडपड

By admin | Updated: September 30, 2015 01:07 IST

त्रुटींची पूर्तता करून अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सुरू

कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाने रद्द केलेली पक्षाची मान्यता परत मिळविण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्ष व स्वाभिमानी शेतकरी पक्षाने धडपड सुरू केली आहे. आयोगाने काढलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याची प्रक्रिया पक्षांच्यावतीने सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्ष म्हणून लढविण्यासाठी आणि चिन्ह वाटपात प्राधान्य मिळण्यासाठी राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे आवश्यक असते. नोंदणीकृत पक्षांना वर्षाला निवडणूक आयोगाला विशिष्ट नमुन्यातील माहिती द्यावी लागते. आयकर भरल्याची विवरणपत्रे, वार्षिक लेखापरीक्षण अहवाल आदी बाबींची पूर्तता करावी लागते, पण राज्यातील १९ पक्षांनी निवडणूक आयोगाला माहिती दिली नसल्याने त्यांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये माजी मंत्री विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती पक्ष व खासदार राजू शेट्टी यांच्या ‘स्वाभिमानी’चा समावेश आहे. आयोगाने मंगळवारी कारवाईनंतर दोन्ही पक्षांच्या पातळीवरील हालचाली गतिमान झाल्या. कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आयोगाच्या दणक्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महापालिका निवडणुकीत जनसुराज्य पक्ष स्वत:च्या चिन्हावर निवडणूक लढवत नाही. मात्र, स्वाभीमानी शेतकरी पक्षाचे काही उमेदवार पक्षाच्या चिन्हावर उभे राहणार असल्याने या पक्षांतर्गत मंगळवारी दिवसभर जोरदार खलबते सुरू राहिली. कोणती माहिती निवडणूक आयोगाला अपेक्षित आहे, त्याची पूर्तता करण्याची प्रक्रिया दोन्ही पक्षांनी सुरू केली आहे.