शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

२८९ कोटींचा विकास आराखडा

By admin | Updated: June 17, 2014 01:46 IST

पालकमंत्री : जुलैपासून कामे सुरू करण्याचे आदेश

कोल्हापूर : जिल्ह्याचा सन २०१४-२०१५ सालाचा २८९ कोटी ५७ लाखांचा वार्षिक नियोजन आराखडा मंजूर करण्यात आला असून, कोणत्याही परिस्थितीत १ जुलैपासून नियोजनाप्रमाणे कामे सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २७ कोटी ५० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी विकासकामांसाठी उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले. गतवर्षी २५३ कोटी ९७ लाखांचा जिल्हा वार्षिक नियोजनाचा आराखडा करण्यात आला होता. त्यातील २४६ कोटी ७५ लाखांचा निधी राज्य सरकारकडून वितरीत करण्यात आला. त्यापैकी २४५ कोटी ५३ लाखांचा निधी खर्च झाला. गतवर्षात कराचे उत्पन्न चांगले मिळाले, वीज बिल वसुली चांगली झाली. वीजगळतीचे प्रमाण कमी झाले. याचा चांगला परिणाम यंदाच्या विकास आराखड्यावर झालेला पाहायला मिळाला. यंदा २७ कोटी ५० लाखांचा जादा निधी मिळाला. नवीन वर्षात करावयाच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या दहा दिवसांत आर्थिक तसेच प्रशासकीय मान्यता दिली पाहिजे आणि १ जुलैपासून कामे सुरूच झाली पाहिजेत, असे आदेश आज, सोमवारच्या जिल्हा नियोजन आढावा बैठकीत देण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. डोंगरी विकास तसेच स्थानिक विकास निधीतून करावयाच्या कामांच्या याद्या सात दिवसांच्या आत आमदारांनी द्याव्यात; तसेच २७ जूनपासून या याद्यांप्रमाणे कामे सुरू झाली पाहिजेत, अशा सूचनाही देण्यात आल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. यापूर्वी नियोजन विभागाने ६० टक्के रक्कम खर्च करावी, असे आदेश होते; परंतु वित्त विभागाने हे बंधन काढून सर्व रक्कम खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे कामे होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्याला २८९ कोटींपैैकी ७१ कोटींचा निधी मिळाला असून, उर्वरित निधीही लवकर मिळेल, असा विश्वास त्यांनी दिला. आजच्या आढावा बैठकीत हुतात्मा स्मारके व माणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या स्मारकाचा मुद्दा चर्चेत आला. जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांची दुरवस्था झाली असून, त्यांची दुरुस्ती तत्काळ हाती घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तेव्हा स्मारके दुरुस्तीचा विशेष कार्यक्रम हाती घेण्यात यावा, असा आदेश देण्यात आला आहे. त्याचबरोबर माणगाव येथील डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी २० कोटींचा निधी राज्याच्या अर्थसंकल्पातून मिळाला असून, या स्मारकासाठी लागणाऱ्या जमिनीचा खर्च कोणी द्यायचा, यावर निर्णय घेण्यासाठी उद्या, मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. (प्रतिनिधी)