शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

विकास संस्थांची रणधुमाळी

By admin | Updated: December 25, 2014 00:10 IST

ग्रामीण राजकारण तापणार : पहिल्या टप्प्यात १५ संस्थांचा कार्यक्रम

कोल्हापूर : ग्रामीण राजकारणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या विकास सेवा संस्थांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. ‘क’ वर्गातील संस्थांची प्रक्रिया सुरू आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या करवीर व कागल तालुक्यांतील ‘ब’ वर्गातील मोठ्या विकास संस्थांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने ऐन थंडीत ग्रामीण राजकारण तापणार आहे. गेले दोन महिने सहकारी संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू आहे. आॅक्टोबर २०१४ अखेर जिल्ह्यात ‘ब’ वर्ग ८००, ‘क’ वर्ग १७१४, तर ६५२ दूध संस्था निवडणुकीस पात्र आहेत. पहिल्या टप्प्यात ‘ड’ वर्गातील संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. आता ‘क’ वर्गातील विकास, दूध, पाणीपुरवठा, पतसंस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. गावातील राजकीय सूत्रे ताब्यात ठेवण्यासाठी विकास व दूध संस्था ताब्यात असणे गरजेचे असते. यासाठी गटा-तटातील राजकारण उफाळून येत असते. ‘ब’ वर्गात मोठ्या विकास संस्थांचा सहभाग असल्याने या संस्थेची निवडणूक प्रतिष्ठेची केली जाते. सध्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून या संस्थांचा निवडणूक कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात १५ विकास संस्थांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, यामध्ये करवीर तालुक्यातील सात, तर कागल तालुक्यातील आठ विकास संस्थांचा समावेश आहे. या संस्थांची प्रारूप (कच्ची) मतदार यादी २३ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आली. या यादीवर १ जानेवारीपर्यंत हरकती घेता येणार असून, ६ जानेवारीला हरकतींवर निर्णय होईल. ९ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी १५ संस्थांचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.