शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

आसुर्लेतील तलाठ्यास लाच घेताना अटक

By admin | Updated: April 15, 2015 23:59 IST

दोनशेंची लाच : घराची पोलिसांकडून झडती

कोल्हापूर/पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले (ता. पन्हाळा) येथील खरेदी केलेल्या जमिनीस नाव लावण्यासाठी दोनशे रुपयांची लाच घेताना तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी बुधवारी अटक केली. हनुमंत शंकर बदडे (वय ४६, रा. वसंत ऋतु कॉलनी, कसबा बावडा) असे त्याचे नाव आहे. लाचलुचपत विभागाची एका महिन्यात ही तिसरी कारवाई आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, महेश भिवा जाधव (रा. आसुर्ले, ता. पन्हाळा) यांनी दि. ३ फेब्रुवारी २०१५ला गावातील गट नं. ३४ मधील क्षेत्र ०.०९.१ आर. इतकी जमीन आपल्या व पत्नीच्या नावावर खरेदी केली आहे. जमिनीस दोघांची नावे लावण्यासाठी जाधव यांनी त्याच दिवशी तलाठी बदडे यांची गावचावडीत भेट घेऊन अर्ज दिला. त्यावेळी बदडे याने त्यांच्याकडे दोनशे रुपयांची मागणी केली. त्यानंतर जाधव यांनी पैसे नंतर देतो, असे म्हणून ते तेथून निघून आले. लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक उदय आफळे यांची भेट घेऊन बदडे याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार आफळे यांनी दोन शासकीय पंच पाठवून लाचेच्या मागणीची खात्री करून घेतली. त्यानंतर बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आसुर्ले गावचावडीच्या आजूबाजूला सापळा लावला. जाधव हे गावचावडीमध्ये गेले. यावेळी दबडे हा कार्यालयातून बाहेर आला. त्याने त्यांच्याकडून दोनशे रुपये घेतले. यावेळी काही क्षणांतच आजूबाजूला सापळा लावून बसलेल्या पोलिसांनी दबडेवर झडप टाकली. अचानक झालेल्या कारवाईने तो भांबावून गेला. सुरुवातीस तो मी लाच घेतली नाही, असा अविर्भाव करू लागला. त्यानंतर पोलिसांनी त्याला नोटांचे नंबर, जाधव व त्याच्यामध्ये झालेले संभाषण दाखविताच तो शांत झाला. ही कारवाई करून पोलीस जीपमधून घेऊन जाताना अश्रू अनावर झाले. बदडे याच्या कसबा बावडा येथील घराची रात्री उशिरा पोलिसांनी झडती घेतली. त्याला करवीर पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. याप्रकरणी पन्हाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक आफळे यांच्यासह पद्मा कदम, हवालदार श्रीधर सावंत, अमर भोसले, जितेंद्र शिंदे, सर्जेराव पाटील आदींनी केली. (प्रतिनिधी)