शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मजुरीवाढीसाठी लवाद नेमणार

By admin | Updated: December 28, 2016 00:14 IST

प्रांत कार्यालयात निर्णय : खर्चीवाल्यांच्या प्रश्न पुन्हा लांबणीवर; कारखाने सुरू

इचलकरंजी : पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या रीतीनुसार लवाद समितीचे पुनर्गठन करून त्यातून खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीसंदर्भात निर्णय करण्यात येईल. त्यासाठी व्यापक बैठक घेण्याचे प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले. त्यामुळे मजुरीवाढीचा प्रश्न पुन्हा लांबणीवर पडला आहे. दरम्यान, बैठकीनंतर यंत्रमागधारकांनी आपले कारखाने सुरू करण्याचे आवाहन केल्यामुळे यातून यंत्रमागधारकांच्या हाती काहीच लागले नसल्याची चर्चा सुरू होती.यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था मिळावी, यासाठी दहा दिवस ‘मी स्वाभिमानी कारखानदार’ या संघटनेच्यावतीने आमरण उपोषण करण्यात आले होते. सोमवारी (दि. २६) वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिलेल्या आश्वासनानंतर बाळ महाराजांनी उपोषण मागे घेतले. त्यावेळी खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीसंदर्भात चक्री उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, त्याला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या आंदोलनाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. तर मजुरीवाढीसंदर्भात प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकाही निष्फळ ठरल्याने हा प्रश्न निकालात निघणार की नाही, असा सवाल होता.या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी बैठक घेतली. यावेळी यंत्रमागधारकांच्यावतीने सचिन हुक्किरे, अजय जावळे, बाळकृष्ण लवटे, अमोद म्हेतर, विकास चौगुले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधींनी म्हणणे मांडताना आजवर झालेल्या विविध आंदोलनांमध्ये मार्ग काढण्यासाठी आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी व शासकीय प्रतिनिधी यांची लवाद समिती नेमली गेली आहे. या प्रश्नीही लवाद समितीचे पुनर्गठण करण्यात यावे आणि हा प्रश्न निकाली काढावा, असे सांगण्यात आले. त्यावर प्रांताधिकारी शिंगटे यांनी या समिती सदस्यांना कळवून समितीचे पुनर्गठण करून लवकरच व्यापक बैठकीद्वारे हा प्रश्न सोडविण्याचा निर्णय जाहीर केला. बैठकीनंतर अजय जावळे, सचिन हुक्किरे यांनी कारखाने सुरू करण्याचे आवाहन केले. (वार्ताहर)मंडप गायब : गोंधळखर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीसंदर्भात चक्री उपोषणाची घोषणा झाली असताना गांधी पुतळा येथील उपोषणावेळी घातलेला मंडप गायब झाल्याने यंत्रमागधारकांचा गोंधळ उडाला. गांधी पुतळ्याजवळ यंत्रमागधारक जमल्याची माहिती मिळताच पोलिस तेथे आले. त्यांनी यंत्रमागधारकांना तेथून हुसकावून लावले. त्यामुळे त्यांनी थेट बाळ महाराजांच्या घराकडे मोर्चा वळविला व त्यांना खर्चीवाल्यांच्या प्रश्नाबाबत जाब विचारला. त्यावर या प्रश्नाबाबत चार दिवसांत तोडगा न निघाल्यास शुक्रवारी मेळावा घेणार असल्याचे बाळ महाराजांनी सांगितले. या सर्व गोंधळाच्या वातावरणामुळे आंदोलनाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती.