शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बिलावर यांची निवड रद्द करा

By admin | Updated: December 24, 2014 00:21 IST

गडहिंग्लज नगरपालिका : विरोधी नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

गडहिंग्लज : विषय समित्यांच्या सभापती निवडणुकीत एका सदस्याला दोन समित्यांच्या सभापतिपदाच्या उमेदवारांचे सूचक किंवा अनुमोदक होता येत नसल्यामुळे महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी झालेली सुंदराबाई बिलावर यांची बेकायदेशीर निवड रद्द करावी, अशी मागणी विरोधी जनता दल-जनसुराज्य व काँगे्रस आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.निवेदनात म्हटले आहे, बांधकाम व नगरविकास सभापतिपदासाठी रामदास कुराडे यांनी, तर वाचनालय व शिक्षण समिती सभापतिपदासाठी मंजूषा कदम यांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. मात्र, त्या दोघांच्याही नामनिर्देशनपत्रावर अनुमोदक म्हणून किरण कदम यांनी स्वाक्षरी केली आहे.नगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार एका सदस्याला दोन ठिकाणी सूचक किंवा अनुमोदक होता येत नसल्यामुळे पीठासन अधिकाऱ्यांनी कदम व कुराडे यांची नामनिर्देशनपत्रे अवैध ठरवून बांधकाम व वाचनालय समिती सभापतिपदाची निवडणूक रद्द केली.तथापि, आमची हरकत विचारात न घेता महिला व बालकल्याण समिती सभापतिपदाच्या उमेदवार सुंदराबाई बिलावर यांचा अर्ज वैध ठरवून त्यांची सभापतिपदी निवड जाहीर केली. बिलावर यांच्या नामनिर्देशनपत्रावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केलेल्या सरिता गुरव यांनी वाचनालय समिती सभापतिपदाच्या उमेदवार कदम यांच्या नामनिर्देशनपत्रावर सूचक म्हणून स्वाक्षरी केली आहे.बांधकाम व वाचनालय या समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडीतील कायदेशीर हरकतीनुसार कदम व कुराडे यांची नामनिर्देशनपत्रे अवैध ठरवून त्या निवडी पीठासन अधिकाऱ्यांनी रद्द केल्या. त्याच कायद्याप्रमाणे नामनिर्देशनपत्र अवैध ठरवून महिला व बालकल्याण सभापती बिलावर यांची निवड रद्द करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर, विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी, जनसुराज्यचे नगरसेवक नरेंद्र भद्रापूर यांच्यासह ९ नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)