मे व जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ऊस पिकांना पाण्याची गरज असते. सध्या तीव्र स्वरुपाचा उन्हाळा असून शेतीला पाणी पुरवठ्याची नितांत गरज असते. ग्रामीण भागात पाटबंधारे खात्याची सरकारी पाणीपट्टी आकारणी ऊस बिलातून वसूल होते. पण मे व जून महिन्यात शेतीला अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे पीके वाळतात. परिणामी ऊसाच्या उत्पादनात घट होते.
पाटबंधारे खात्याने नद्यांच्या पात्रात पाणी पातळी समान ठेवून शेती पाणी उपसा पंपांद्वारे शेतीस पाणीपुरवठा पाऊस पडेपर्यंत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.