शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाकडून ठरावांच्या अंमलबजावणीला दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी या घटकांच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत (सिनेट) विविध ठराव मंजूर केले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी या घटकांच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत (सिनेट) विविध ठराव मंजूर केले जातात. मात्र, या ठरावांच्या अंमलबजावणीत दिरंगाई होत असल्याचे वास्तव आहे. दोन-तीन वर्षे कार्यवाही होत नाही. विद्यापीठाचे सर्वोच्च अधिकार मंडळ असलेल्या अधिस‌भेमध्ये ज्या दृष्टिकोनातून या ठरावांबाबत सदस्य निर्णय घेतात, त्याकडे विद्यापीठ प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.

गेल्या तीन वर्षांमध्ये अधिसभेमध्ये विविध ३३ ठराव मंजूर केले आहेत. त्यातील १९ ठरावांवर अद्याप कार्यवाही सुरू असून, १३ ठरावांवर कार्यवाही पूर्ण झाली आहे. अद्याप कार्यवाही सुरू असलेल्या ठरावांमध्ये अधिकतर संख्या गेल्या दोन वर्षांतील ठरावांची आहे. अधिसभा झाल्यानंतर ४५ दिवसांमध्ये त्याचा इतिवृतांत तयार केला जातो. या सभेतील निर्णय, ठरावांवरील पुढील कार्यवाही विषयानुसार अभ्यास मंडळे, विद्या परिषद अथवा व्यवस्थापन परिषदेकडून केली जाते. मात्र, या अधिकार मंडळांकडे ठराव सादर करण्यास विद्यापीठ प्रशासनाकडून दिरंगाई आणि दुर्लक्ष होते. अनेकदा अपेक्षित वेळेत ठराव सादर होत नाहीत. त्यामुळे साहजिकच त्यावरील अंमलबजावणी लवकर होत नाही. त्याचा फटका विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि एकूणच विद्यापीठाला बसत असल्याचे वास्तव आहे. अधिसभेतील ठराव, निर्णयांच्या अंमलबजावणीची कार्यवाही प्रशासनाने वेळेत करणे आवश्यक आहे.

चौकट

या ठरावांवर अद्याप कार्यवाही सुरू

अधिसभेने मंजूर केलेल्या १९ ठरावांवर अद्याप कार्यवाही सुरू आहे. त्यात सौरऊर्जा प्रकल्प निर्माण करणे, खेळाडूंना १५ ते १५ ग्रेस गुण देणे, क्रीडा अधिविभागांमधील रिक्त पदे भरणे, महाविद्यालयातील प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविणे, नवीन विनाअनुदानित महाविद्यालयांना आर्थिक निधी देणे, पेटंट कायदेतज्ज्ञ नेमणे, विद्यापीठाच्या निधीतून नियमित कर्मचारी नियुक्त करणे, कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजना सुरू करणे, संलग्नित महाविद्यालयातील प्रशासकीय सेवकांसाठी विद्यापीठात कॉमन रूम उपलब्ध करणे, कोअर इन्फो सोल्युशनवर कारवाई करणे, विद्यापीठातील पदवी प्रदान सभागृह वापरण्याबाबतची नियमावली करणे, आदींचा समावेश आहे.

प्रतिक्रिया

अधिसभा हे विद्यापीठाचे सर्वोच्च सभागृह आहे. त्यातील ठरावांची लवकर अंमलबजावणी होणे अपेक्षित असते. मात्र, काही ठराव होऊन दोन- तीन वर्षे झाली, तरी त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. त्याला प्रशासनाची दिरंगाई कारणीभूत असल्याचे दिसते. प्रशासनाने अधिसभेला गृहित धरून काम करणे योग्य नाही. यामध्ये प्रशासनाने बदल करावा.

- डॉ. एस. डी. डेळेकर, सदस्य, अधिसभा