शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शाळांची घटलेली पटसंख्या चिंताजनक

By admin | Updated: July 15, 2014 01:02 IST

जयसिंगपूर नगरपालिका : पालकांची मानसिकता बदलणे गरजेचे

संदीप बावचे -जयसिंंगपूरशहरातील नगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची घटलेली पटसंख्या हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खासगी शाळांकडे वाढलेला पालकांचा ओढा यामुळे नगरपालिका शाळेत विद्यार्थ्यांची संख्या अपुरी दिसून येत आहे. नगरपालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारत चालल्याचे चित्र जरी असले तरी या शाळेत पाल्याला घालण्यासाठी पालकांची उदासीनता दिसून येत आहे.शहरात एकूण ३२ शाळा असून, यामध्ये नगरपालिकेच्या दहा शाळा आहेत. पहिली ते सातवी ५ व पहिली ते चौथी ५ असे वर्ग असून, उर्दू शाळेचाही यातच समावेश आहे. जयसिंगपूर शहर हे शिक्षणाचे ‘माहेर घर’ म्हणून ओळखले जाते. बालवाडीपासून पदवी महाविद्यालये, इंजिनिअरिंग, वैद्यकीय शिक्षण येथे पूर्ण करता येते. नगरपालिकेअंतर्गत शहरात दहा शाळा असून एकूण एक हजार ६७ विद्यार्थी येथे सध्या शिक्षण घेत आहेत. शाळांप्रमाणे पटसंख्येचा विचार केल्यास किमान १५०० ते २००० विद्यार्थ्यांची गरज आहे. आजच्या स्पर्धेत आपला पाल्य टिकावा, त्याला दर्जेदार शिक्षण मिळावे, त्याची प्राथमिक तयारी उच्च दर्जाची व्हावी याकडे पालक लक्ष देत आहेत. सध्या खासगी शाळा झपाट्याने वाढल्या आहेत. या शाळेतील शिक्षणामुळे आपला मुलगा लवकर हुशार होईल, असेच पालकांना वाटत आहे. याचाच परिणाम नगरपालिका शाळांमधून दिसून येत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास नगरपालिका शाळा या नावापुरत्याच शिल्लक राहतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे पालिका शिक्षण मंडळाबरोबरच प्रशासन विभाग व शिक्षकांनी पुढाकार घेऊन शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.