शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीचा निर्णय सर्वसहमतीनेच

By admin | Updated: July 31, 2016 00:48 IST

चंद्रकांतदादा पाटील : एकतर्फी रेटारेटी करून चालणार नाही; दोन्ही बाजूंच्या लोकांशी चर्चा करणार

कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीचा निर्णय ग्रामीण जनतेला विश्वासात घेऊन सर्वसहमतीने केला जाणार आहे. यासाठी एकतर्फी रेटारेटी केली जाणार नाही, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिले. या विषयावर उद्या, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही बाजूंच्या लोकांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री पाटील म्हणाले, हद्दवाढ होण्यासाठी महापालिका व नगरसेवकांनी ग्रामीण भागात जाऊन तेथील जनतेला विश्वासात घ्यावे व आपली भूमिका पटवून द्यावी, असे आपण वारंवार सांगितले आहे. हा निर्णय सर्वसहमतीनेच होणारा आहे. ग्रामीण जनतेला विश्वासात घेऊनच तो केला जाईल. यासाठी एकतर्फी रेटारेटी करून चालणार नाही. या विषयावर उद्या, सोमवारी मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस हे समर्थक व विरोधक यांच्याशी चर्चा करणार आहेत. दोन्ही बाजूंचे प्रत्येकी पाच व दहा लोकप्रतिनिधी असे वीसजण या बैठकीला उपस्थित राहतील. या बैठकीत हद्दवाढ का गरजेची आहे? तसेच हद्दवाढ हा प्रश्न फक्त कोल्हापूरचा नसून, राज्यातील इतर महापालिकांचाही आहे, हे मुख्यमंत्री यावेळी सांगणार आहेत. मुंबईतील आमदारांचे निवासस्थान असलेल्या ‘मनोरा’ या इमारतीचे पुनर्बांधकाम केले जाणार आहे. वीस वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत इतक्या लवकर खराब व्हायला नको होती. आमदारांचीही पुनर्बांधणीसह प्रशस्त सूटची मागणी होती. त्यानुसार बांधकामाचे टेंडर निघाले असून, एक-एक टॉवरचे टप्प्याटप्प्याने बांधकाम केले जाणार आहे. पूर्वी दोन रूमचा एक सूट हा आमदारांसाठी होता. परंतु, तो अपुरा पडायचा. त्यामुळे आमदारांना दुसऱ्या सूटची गरज भासत होती. त्यामुळे आता तीन रूमचा एक सूट बांधला जाईल. वास्तविक, अधिवेशन हे विविध कायदे करून ते मंजूर करण्यासाठी असते, पण विरोधकांकडून स्वतंत्र विदर्भासह मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे विषय काढून अधिवेशनाचे कामकाज बंद पाडण्याचे काम केले जात आहे. नवीन सहकारमंत्री सुभाष देशमुख हे सहकारातील तज्ज्ञ आहेत. त्यामुळे ते आपल्या अनुभवाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून या खात्याला न्याय देतील. (प्रतिनिधी)