शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीनेच विकास ही भ्रामक कल्पना : नरके

By admin | Updated: June 16, 2015 01:14 IST

मुख्यमंत्र्यांना शुक्रवारी भेटणार : कळंब्यातील मेळाव्यात निर्णय; हद्दवाढीला तीव्र विरोध

कळंबा : शहर व उपनगरांतील नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविण्यात महापालिका प्रशासन पुरते अपयशी ठरले आहे, तर या हद्दवाढीत प्रस्तावित २० गावांना सुविधा कशा पुरविणार?, असा सवाल उपस्थित करत, हद्दवाढीनेच शहर व परिसराचा विकास होईल ही भ्रामक कल्पना असल्याचा टोला आमदार चंद्रदीप नरके यांनी हद्दवाढविरोधी कृती समितीच्या कळंबा येथे सोमवारी झालेल्या मेळाव्यात लगावला. शुक्रवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान भेटून हद्दवाढीविरोधी निवेदन देण्याचे यावेळी सर्वानुमते ठरले. मेळाव्यास कोल्हापूर शहर दक्षिण मतदारसंघाचे आमदार अमल महाडिक व आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.आमदार नरके म्हणाले, हद्दवाढीचे जमिनीचे भाव वाढणार, शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन असलेल्या शेतीवरच हद्दवाढीने गंडांतर येणार आहे. ग्रामीण संस्कृती टिकविण्यासाठी हद्दवाढ फेटाळणे गरजेचे आहे. कोल्हापूर शहरापेक्षा गावे निश्चितच स्वायत्त व विकसित आहेत. ग्रामीण भागाचा विकास करण्यास आम्ही समर्थ आहोत, ग्रामीण भागाचा विकास म्हणजे हद्दवाढ, असे फसवे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.आमदार अमल महाडिक म्हणाले, प्रस्तावित गावांची लोकसंख्या मोठी आहे. स्वतंत्र नगरपरिषद होण्याइतपत ही गावे मोठी व स्वावलंबी आहेत. एमआयडीसीच्या शहरातील समावेशाने उद्योगधंदे स्थलांतरित होण्याची भीती आहे, तर करवाढीचा फटका ग्रामीण नागरिकांना बसणार आहे. कोणतीही भौगोलिक संलग्नता नसताना ही गावे हद्दवाढीत घेण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. केंद्र सरकार ग्रामपंचायतींना विविध योजनांतून निधी देते, त्यातून गावे विकसित व हागणदारी मुक्त झाली आहेत. मात्र, मनपाला सांडपाण्याचे नियोजन करता आलेले नाही, असा खोचक प्रश्न आमदार डॉ. मिणचेकर यांनी उपस्थित केला. यावेळी पंचायत समिती सदस्य अरुणिमा माने, जयसिंग काशीद, विलास पाटील, महेश चव्हाण, सरदार मिसाळ आदींसह प्रस्तावित गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नाथाजी पोवार, एस. आर. पाटील, प्रताप साळोखे, बाजीराव पाटील यांचीही भाषणे झाली. (वार्ताहर)