शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
3
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
4
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
5
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
8
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
9
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
10
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
13
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
16
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
17
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
18
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
19
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
20
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?

खाटांगळेत दोघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By admin | Updated: June 16, 2014 00:52 IST

पाण्याच्या चावीस मोटर जोडताना दुर्घटना

सांगरूळ : खाटांगळे (ता. करवीर) येथे पाण्याच्या चावीला मोटर जोडताना विजेचा धक्का बसून दोघांचा मृत्यू झाला. मयूरेश विठ्ठल पाटील (वय १५) व विश्वनाथ विठ्ठल पाटील (६०) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना आज, रविवारी दुपारी सव्वाचार वाजता घडली.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : मयूरेश पाटील याचे खाटांगळे पैकी परशराम नगर येथे घर आहे. मयूरेश आमशी (ता. करवीर) येथील साईसंकुल येथे कुस्तीच्या सरावासाठी वसतिगृहात राहायला होता. दोन दिवसांची सुटी घेऊन तो आपल्या घरी आला होता. दुपारी चार वाजता चावीला पाणी आले होते. चावीला पाणी कमी दाबाने येत असल्याने मोटर जोडावी लागते.चावीला मोटर जोडत असताना मयूरेशला विजेचा धक्का बसला. तो वायरला चिकटून तडफडत होता. याच दरम्यान त्याच्या घराशेजारी विश्वनाथ पाटील हे जनावरांसाठी वैरणीचा भारा घेऊन चालले होते. त्यांना मयूरेश तडफडत असल्याचे निदर्शनास आल्याबरोबर भारा रस्त्यातच टाकून त्याला वाचविण्यासाठी धाव घेतली. त्यांनी त्याला ओढण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही विजेचा धक्का बसला. त्यामध्ये दोघेही जमिनीवर कोसळले. ते धडपडताना पाहून शेजारील मुलगा संदेश पाटील याने विजेचा बटन बंद केले. दोघांना तातडीने सीपीआर येथे उपचारासाठी नेले; मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. (वार्ताहर)