शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव बाजार समितीसमोर भरलेले सौदे पालिकेकडून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:19 IST

: लॉकडाऊन कालावधीत प्रथमच बाजारातील गर्दी कमी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील नगरपालिकेने आठवडा बाजारावर नियंत्रण ...

: लॉकडाऊन कालावधीत प्रथमच बाजारातील गर्दी कमी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील नगरपालिकेने आठवडा बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी शुक्रवारी पहाटे वडगाव बाजार समितीसमोर भरलेले सौदे बंद केले. आठवडा बाजार ठिकाणी विक्रेत्यांना बसण्यासाठी व ग्राहकांना ये-जा करण्यासाठी पट्टे आखून दिले होते. त्यामुळे लॉकडाऊन कालावधीत प्रथमच बाजारातील गर्दी कमी झाल्याचे दिसत होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजीपाला विक्री व आठवडा बाजाराच्या ठिकाणी विशेष मोहीम राबवून गर्दी रोखण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नव्हता. शुक्रवारी पुन्हा आठवडा बाजार असल्याने नगरपालिकेने वडगाव बाजार समितीसमोर सुरू असलेले सौदे बंद केले. विकली मार्केट येथे भरणाऱ्या बाजाराच्या ठिकाणी विक्रेत्यांसाठी खास मांडणी केली होती. तसेच ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी मार्ग निश्चित केला होता. गर्दी न करता विक्रेत्यांनी भाजीपाल्याची मांडणी केली आणि ग्राहकही ये-जा करत होते.

दक्षतेचा भाग म्हणून विकली मार्केटमधील १२५ आणि झेंडा चौकात बसणाऱ्या २५ फळ, भाजीपाला विक्रेत्यांची अ‍ॅँटिजन तपासणी केली. त्यात सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला. प्रशासनाच्या नियोजनामुळे बाजारावरील गर्दीवर नियंत्रण आल्याचे दिसून आले.