शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमींची मरणासन्न अवस्था

By admin | Updated: January 16, 2016 00:53 IST

गगनबावडा तालुका : आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव

चंद्रकांत पाटील -- गगनबावडा--जीवनभर काबाडकष्ट करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या मानवाला किमान मरण तरी चांगले यावे, अशी अपेक्षा असते; परंतु कित्येक ठिकाणच्या स्मशानभूमीत आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव असल्याने मृतदेहांना सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.गगनबावडा तालुक्यात तालुक्याच्या निर्मितीपासून बहुतांश स्मशानभूमींची ‘जैसे थे’ अवस्था आहे. काही तुरळक गावांत शासनाचा निधी खर्च करून स्मशानशेड बांधण्यात आले आहेत; परंतु त्यांची देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. तालुक्यातील बहुतांश स्मशानभूमींच्या जमिनी खासगी मालकीच्या आहेत. खासगी मालकीत असलेल्या या जागा शक्यतो नदीकाठाला आहेत. प्रत्येक गावात वेगवेगळ्या समाजाच्या स्मशानभूमी आहेत; परंतु या सर्व स्मशानभूमींची वाताहत झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्याचप्रमाणे स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते व पायवाटा या खासगी मालकीच्या आहेत. शेतीच्या दिवसात एखाद्याचा मृत्यू झाल्यास स्मशानभूमीपर्यंत पोहोचताना ग्रमस्थांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या वाटा ग्रामपंचायतींच्या मालकीच्या असाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांमधून गेली अनेक वर्षे केली जात आहे; परंतु शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने आयुष्यभर काबाडकष्ट करणाऱ्या व्यक्तींच्या वाट्याला मरणानंतरही वाईट यातना येत आहेत.पर्यटनाच्यादृष्टीने कितीही गाजावाजा केला जात असला तरी स्मशानभूमी हा महत्त्वाचा प्रश्न सुटणे गरजेचे आहे. स्थानिक पदाधिकारी व सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेऊन स्मशानभूमी व सुशोभीकरण होण्याच्यादृष्टीने शासनाच्या विविध योजनांचा निधी या कामासाठी खर्च करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.पाणीटंचाईचाही फटकातालुक्यातील बहुतांश स्मशानभूमी या घनदाट राई व काटेरी झाडाझुडपांत आहेत. मृतदेहांबरोबर आलेल्या व्यक्तींना काट्यातून मार्ग काढावा लागतो. त्याचप्रमाणे मृतदेहाच्या सर्व विधी पार पडेपर्यंत इतरांना स्मशानभूमी शेजारीच ताटकळत उभे राहावे लागते. काही ठिकाणी वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने उन्हाचा त्रास, तसेच विधीवेळी लागणारे पाणी जवळपास नसल्याने काहीवेळा घराकडून पाणी घेऊन जावे लागते. या सर्व अडचणी प्रत्येकवेळी लोकांना भेडसावत आहेत.