शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

दिवस-रात्र अवजड वाहनांची डोकेदुखी

By admin | Updated: November 2, 2014 23:53 IST

एकेरी रस्ता करा : शुक्रवार गेट पोलीस चौकी-शिवाजी पूल चिंचोळ््या रस्त्यावर शेकडो खड्डे

कोल्हापूर : दिवस-रात्र अवजड वाहने, त्यातच रस्त्यामध्ये पडलेले मोठमोठे खड्डे व वाहतुकीसाठी अगदी चिंचोळा रस्ता, अशी स्थिती शुक्रवार गेट पोलीस चौकी ते शिवाजी पूल या रस्त्याची झाली आहे. हा रस्ता एकेरी (वन-वे) करावा व पापाची तिकटीपासून लोणार गल्लीमार्गे जुना बुधवारपेठ मार्गे असलेल्या पर्यायी मार्गाने वाहने जावीत, अशी मागणी नागरिकांमधून आता जोर धरू लागली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या गलथान कारभारामुळे हा रस्ता गेली दहा वर्षे असाच आहे, असा नागरिकांचा आरोप आहे.खड्ड्यातगेलंय कोल्हापूर माझं !या रस्त्यावरील डांबरीकरण उखडले आहे. वाहनांमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य झाले आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी घराचे दार बंद केल्याशिवाय पर्याय नाही. धुळीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.- राजू कोरे, नागरिक.सततच्या अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याची संपूर्ण धूळधाण झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहने चालवणे अवघड आहे. महापालिका नवीन रस्ता कधी करणार या प्रतीक्षेत आहोत, तो लवकर व्हावा.- शकुंतला मांगुरे, नागरिक.नुसतेच पॅचवर्कया रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या दहा वर्षांत नुसत्या पॅचवर्कशिवाय काही झालेले नाही. डांबर लागलेले कधीच बघितलेले नाही. सततच्या अवजड वाहनांमुळे ड्रेनेजच्या प्रश्नाबरोबर अंतर्गत जलवाहिनीचा प्रश्न निर्माण झाला आहे. महानगरपालिका नागरिकांकडून एकीकडे घरफाळ्याच्या माध्यमातून विविध कर घेते, पण कधी ड्रेनेजची पाईपलाईन बदलली नाही. त्यातच कोंडाळ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरुन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कंबरडे मोडणारा रस्ताशुक्रवार गेटपासून ते पंचगंगा नदी शिवाजी पुलापर्यंतच्या रस्त्याची हमखास कंबरडे मोडणारा म्हणून विशेष ओळख होत आहे. शिवाजी पूल ब्रह्मपुरी पिकनिक पॉर्इंट सेंटरजवळील रस्त्यावरच घरगुती जलवाहिनी वरती आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेत अपघात होण्याचा धोका संभवतो. गेले कित्येक दिवस ही पाईपलाईन उघड्यावर पडली आहे. त्यामुळे कुठं रस्ता आहे हे समजतच नाही, असे नागरिक म्हणत आहेत.२० लाख मंजूर, असे म्हणतातया रोजच्या त्रासाला नागरिक अक्षरश: कंटाळले आहेत. नागरिक जेव्हा खराब रस्ता व अन्य प्रश्नांसाठी गेल्यावर महापालिका प्रशासन नुसती उडवाउडवीची उत्तरे देऊन ‘तुमच्या रस्त्याला २० लाख रुपये मंजूर’ झाले आहेत, असे थातुरमातुर उत्तरे देते. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे गाऱ्हाणे सांगितल्यावर त्यांच्याकडूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे आम्ही दाद मागायची कोणाकडे, अशा भावना व्यक्त होत आहेत.