शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

वेगळी ओळख जपलेला दाउदी बोहरा समाज

By admin | Updated: April 27, 2015 00:19 IST

शांतताप्रिय समाज : जिल्ह्यात फक्त २१० लोक संख्या--लोकमतसंगे जाणून घेऊ--दाउदी बोहरा समाज

संतोष पाटील-  कोल्हापूर  -शांतताप्रिय आणि उद्यमशील समाज म्हणून दाउदी बोहरा समाजाची ओळख आहे. समाजातील कोणावरही साध्या किरकोळ गुन्ह्याचीही नोंद नाही. शरीरासह परिसर स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. ज्या देशात, प्रदेशात राहणार तिथला कायदा-नियम अत्यंत काटेकोरपणे पाळण्याकडे या समाजाचा कल असतो. महिला व पुरुषांसाठी ड्रेसकोड आहे. अशा अनेक वैशिष्ट्यांसह उच्चतंत्रज्ञानाची कास धरत धर्मगुरूंचा सल्ला किंवा आदेश शिरसावंद्य मानत दाउदी बोहरा समाजाने आपले वेगळे अस्तित्व व ओळख टिकवण्यात यश मिळविले आहे. सामाजिक शिस्तबद्धतेसह पुरोगामीत्व जपत वाटचाल करत असलेल्या दाउदी बोहरा समाजाने वेगळा ठसा उमटविला आहे. या समाजाचे आचरण, विचारपद्धती, राहणीमान याबाबत ‘समाज ओळख’ या सदरात अधिक माहिती जाणून घेऊया..!जगाच्या कानाकोपऱ्यांत बोहरा समाज विखुरला आहे. व्यवसाय हाच चरितार्थचा पाया मानत या समाजाची वाटचाल सुरू आहे. बोहरा समाजातील लोक नोकरीपेक्षा व्यवसायास प्राधान्य देतात. त्यांची आडनावे गाव किंवा व्यवसायावरूनच असतात. जसे व्हीनस टॉकीजचे मालक म्हणून हकिमभाई बोहरा यांचे आडनाव ‘व्हीनसवाला’, तर एखादा लोखंडाचा व्यवसाय करत असेल तर तो ‘लोखंडवाला’. इतक्या खोलवर व्यवसायाचे महत्त्व रूजले आहे. या समाजाची जिल्ह्यात ५५ घरे असून, २१० लोकसंख्या आहे. ‘दाईल उल मुत्तलक’ म्हणजेच समाजाचे प्रमुख धर्मगुरू, ते जो आदेश देतील, जी कुराणाच्या साक्षीने दीक्षा देतील, ती अंतिम मानण्याचा प्रघात या समाजात आहे. जीवनात धर्मगुरूंचे स्थान सर्वाेच्च आहे. पांढरा शुभ्र कुर्ता, पायजमा अन् टोपी हा पुरुषांचा पेहराव, तर महिलांसाठी ‘रिदा’ हा पोशाख आहे. जगभरातील बोहरा समाजाची अरबीमिश्रित गुजराती ही मातृभाषा आहे. समाजातील प्रत्येकाला किमान कुराण समजण्याइतपत अरबी भाषा येतेच. ५२ वे दाईल उल मुत्तलक (सयैदना) मोहम्मद बुऱ्हाद्दिन यांनी अलिगड मुस्लिम विश्वविद्यालयाचे कुलगुरूपद भूषविले. त्यांनी सर्व धर्मांतील लोकांसाठी अनेक शाळा, महाविद्यालये, दवाखान्यांची उभारणी केली. सर्वधर्मियांसाठी व्यवसायाचे मार्गदर्शन व मदत करणारी ‘बुऱ्हानिया बिझनेस सेंटर’ची मुंबईत स्थापना केली. त्यांच्या मार्गदर्शनाने प्रेरित होऊन बोहरा समाजाने पक्ष्यांसाठी तब्बल २० हजार ६३१ घरट्यांचे जतन केले. त्याची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये नोंद झाली. या कार्यामुळे केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ने गौरविले. १७ जानेवारी २०१४ रोजी त्यांचे वयाच्या १०२व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीवेळी जगभरातून लाखोंच्या संख्येने आलेल्या बोहरा समाजातील व्यक्तींनी जगाला शिस्तबद्धतेचे दर्शन घडविले. सध्या ५३वे गुरू अलीकदर मुफद्दल सैफुद्दिन यांच्या मार्गदर्शनाखाली जगभरातील बोहरा समाजाची वाटचाल सुरू आहे.समाजातील प्रत्येकाला ‘युनिक आयडेंटी कार्ड’ दिले जाते. मूल जन्माला आल्यानंतर दिल्या जाणाऱ्या या स्मार्टकार्डवर त्याचे नाव, छायाचित्र, जन्मदिनांक, पत्ता, कौटुंबिक आर्थिक स्थिती, रक्तगटासह एखादा आजार असल्याची माहिती, आदी नोंदी असतात. जगभरातील सर्व बोहरा समाजातील प्रत्येक व्यक्तीकडे अशा प्रकारचे कार्ड असते. ेएकमेकास साहाय्यसमाजातील व्यक्तींना घरबांधणीसाठी आर्थिक मदत केली जाते. समाजाची बँकेसारखी अर्थव्यवस्था आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले लोक निधी जमा करतात. गरज असेल त्यावेळी हा निधी परत केला जातो, तर याच निधीतून समाजातील गरीब व गरजूंना आवश्यकतेनुसार बिनव्याजी आर्थिक मदत केली जाते.मोफत भोजनधर्मगुरू सैफुद्दिन यांनी जगभरातील बोहरा समाजासाठी धाली पद्धत (कम्युनिटी किचन संकल्पना) सुरू केली. जगभरात दहा लाखांहून अधिक बोहरा कुटुंबांना मोफत भोजनाचा डबा पोहोच केला जातो. वेगवेगळ्या आर्थिक स्तरांत जगणाऱ्या समाजबांधवाला एकसमान भोजन मिळाले पाहिजे, ही यामागील उदात्त भावना आहे. कोल्हापुरातील बोहरा समाजाचे अमील (जमातीचे प्रमुख) भाईसाहेब हसन शाकीर यांच्या मार्गदर्शनानुसार सामाजिक व वैयक्तिक वाटचाल सुरू आहे. कोल्हापुरातील ५५ घरांत सकाळी भोजनाचा डबा पोहोचतो.ज्या देशात व प्रदेशात राहता, तेथील कायदे- नियम कटाक्षाने पाळा. समाजात वावरत असताना कोणतीही भाषा बोला. मात्र, घरी आल्यानंतर मातृभाषेतूनच संवाद साधा. बोहरासह सर्व धर्मातील लोकांबाबत सहिष्णूता बाळगा. स्वत:सह समाजाची, देशाची प्रगती करा. ही धर्मगुरूंनी दिलेली शिकवण समोर ठेवूनच बोहरा समाजाची वाटचाल सुरू आहे. - हकिमभाई बोहरा-व्हीनसवालामाजी सचिव, बोहरा समाज बोहरा समाज हा उच्च तंत्रज्ञानाच्या वापरात आघाडीवर आहे. त्याच्या माध्यमातून जगभरातील समाजबांधव एकत्र बांधले गेले आहेत. धर्मगुरूंचे आदेश, सूचना, प्रवचन, आदींची माहिती इंटरनेट व मोबाईलच्या माध्यमातून घेतली जाते. समाजाने आयोजित केलेले कार्यक्रम सुनियोजित असतात. त्यात कोणताही गोंधळ किंवा गर्दी होताना दिसत नाही. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पडतात. रमजान, मोहरम किंवा धार्मिक विधीवेळी समक्ष दर्शन शक्य नसल्यास इंटरनेटच्या माध्यमातून धर्मगुरूंचे ‘लाईव्ह’ दर्शन घेतले जाते.समाजाची वैशिष्ट्येप्रत्येकाची युनिक आयडेंटीलग्नात खर्च कमी, उधळपट्टीला चाप‘कम्युनिटी किचन’ संकल्पनापूर्णत: शिक्षित समाजअत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरमहिला व पुरुषांसाठी ड्रेसकोड‘अत्यंत शांतताप्रिय लोक’म्हणून ओळखपुरोगामी विचारांची कासमुलांप्रमाणेच मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण अधिकवास्तव्य असणाऱ्या देशांतील कायदे-नियमाचे पालननोकरीपेक्षा व्यवसायाकडे कलघरबांधणीसह व्यापारासाठी समाजाकडून आर्थिक मदतगाव, कामधंद्यांवरून आडनावेधर्मगुरूंना अनन्यसाधारण महत्त्वघटस्फोटाचे प्रमाण अत्यल्पवेगळी मशिद, तीनवेळा नमाज पठणशारीरिक व परिसर स्वच्छतेला महत्त्व व प्राधान्य