शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

डॉल्बीवर नाचण्याच्या नादाने संसारच उघड्यावर !

By admin | Updated: September 30, 2015 00:36 IST

वैभव ऐनापुरेचा मृत्यू : कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का

कोल्हापूर : डोळे दीपवून टाकणारे लाईट इफेक्टस आणि डॉल्बी सिस्टीमच्या तालावर कार्यकर्त्यांचा जल्लोष, हा माहौल पाहण्यासाठी हजारो नागरिक रविवारी रस्त्यांवर आले होते. हा जल्लोष अनुभवण्यासाठी ‘तो’ही सायंकाळी घराबाहेर पडला होता. डॉल्बीच्या ठेक्यावर त्यालाही नाचण्याचा मोह आवरता आला नाही. मात्र, याच डॉल्बीच्या आवाजाच्या धक्क्याने हृदयविकाराचा झटका आल्याने वैभव ऐनापुरे या युवकाला आपला जीव गमवावा लागला. राजारामपुरीतील ‘स्वामी पाणीपुरवठा’जवळ राहणारे वैभव आदिनाथ ऐनापुरे हे एका खासगी कंपनीत कामाला होते. आई लहानपणीच, तर वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाल्याने वैभव यांच्यावरच कुटुंबाची जबाबदारी होती. वैभव व त्यांची पत्नी हे दोघेजणच घरी असतात. गणेश विसर्जन मिरवणुकीदिवशी सायंकाळी चार वाजता ते घरातून चहा घेऊन आपल्या काही मित्रांसोबत बाहेर पडले. एका मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचताना काही वेळात अस्वस्थ वाटू लागल्याचे त्यांनी मित्रांना सांगितले. मित्रांनी त्यांना मिरवणुकीतून बाजूला नेले व ताराबाई रोड, बाबूजमाल दर्ग्याजवळ बसविले. यावेळी एका मित्राने लिंबूपाणी पिण्यास दिले. यावेळी उलट्या सुरू झाल्याने त्यांना ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. वैभव यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे. वैभव यांच्या एका बहिणीचे लग्न झाले असून, सध्या त्या इस्लामपूर येथे असतात. त्यामुळे वैभव यांच्या पत्नीचा आधार गेला आहे. ही बातमी समजताच नागरिकांची त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. प्रत्येकजण वैभव यांची पत्नी मीरा व त्यांची बहीण वैशाली देसाई यांना आधार देत आहेत. मात्र, वैभवच्या जाण्याने घरची कमावती व्यक्तीच गेल्याने ‘आता घर कसे चालवायचे,’ असा प्रश्न पत्नीला पडला आहे.