शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बुडित क्षेत्रातील घरांच्या मोजणीला धरणग्रस्तांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:24 IST

आजरा: सर्फनाला धरणाच्या बुडित क्षेत्रातील सध्या अस्तित्वात असणारी घरे, गोठे, झाप यांची ...

आजरा: सर्फनाला धरणाच्या बुडित क्षेत्रातील सध्या अस्तित्वात असणारी घरे, गोठे, झाप यांची मोजणी करून सर्वांची नुकसानभरपाई देण्याची लेखी हमी द्यावी. अन्यथा बुडित क्षेत्रातील घरांच्या मोजणीस धरणग्रस्तांचा विरोध राहील, असे सांगत धरणग्रस्तांनी आज घरांच्या मोजणीचे काम बंद पाडले.

धरणाचे काम सुरू होऊन सुमारे वीस वर्षांचा कालावधी लोटला आहे. दरम्यानच्या काळात धरणग्रस्तांनी आपल्या कौटुंबीक गरजेपोटी राहत्या घरांची दुरुस्ती केली आहे.

जनावरांसाठी गोठा, झाप व पडवी यांचे विस्तारीकरण केले आहे. त्याचबरोबर कुटुंबाच्या उपजीविकेसाठी पाळीव जनावरांसाठी गोठा बांधणी ही केलेली आहे. धरण होणार आहे, आपण बुडीत क्षेत्रात आहोत, असे म्हणून या अतिमहत्त्वाच्या गोष्टी आम्ही थांबवू शकत नाही. आमच्या जगण्यासाठी अतिगरजेच्या गोष्टी धरणग्रस्तांना कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे शासनाने या सर्वांची मोजणी करून त्याप्रमाणे भरपाई देणे गरजेचे आहे. याबाबत शासनाची भूमिका अद्यापि स्पष्ट नसल्याने आमचा घरांच्या मोजणीच्या कामाला विरोध आहे, असेही धरणग्रस्तांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. भरपाई देण्याबाबत लेखी हमी दिल्याशिवाय मोजणी प्रक्रिया सुरू करण्यास आमचा विरोध आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर राहील, असेही निवेदनात नमूद केले आहे. मोजणीसाठी पोलीस बंदोबस्तात आलेल्या आलेल्या अधिकाऱ्यांना मोजणी न करताच धरणग्रस्तांनी परत पाठवले

धरणग्रस्तांनी मोजणीच्या कामाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवत धरणाच्या मोजणीच्या कामाला विरोध केला व काम थांबविले.

फोटोकॅप्शन.

- सर्फनाला धरणाच्या बुडित क्षेत्रातील घरांच्या मोजणीला विरोध करताना धरणग्रस्त.