शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
4
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
5
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
6
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
7
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
8
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
9
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
10
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
11
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
12
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
13
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
14
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
15
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
16
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
17
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
18
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
19
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
20
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?

दिवसाआड पाणीपुरवठा आॅगस्टपर्यंत कायम

By admin | Updated: July 3, 2016 00:48 IST

महापालिकेचे यशस्वी नियोजन : तीन महिन्यांत एकही तक्रार नाही

कोल्हापूर : यंदा राधानगरी धरणातील संपलेले पाणी आणि भविष्यात साठणारे पाणी यांचा विचार करता महापालिकेने कोल्हापूर शहरासाठी ‘एक दिवसाआड’पाणी पुरवठा आॅगस्टपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन महिन्यांतील या नियोजनाचा अनुभव चांगला आहे. शहरात पाणीपुरवठा सुरळीत राहिला. त्याबद्दल कोणतीही तक्रार आलेली नाही; त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होऊन पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नागरिकांनी हातभार लावला आहे. टंचाईच्या काळातही प्रशासनाने समयसूचकतेने योग्य नियोजन केल्यामुळे एप्रिलपासून आजपर्यंत रोज किमान सुमारे ४० एमएलडी पाणीबचत करण्यात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला यश आले. गेल्यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे त्याचा परिणाम धरणे उशिरा व कमी भरण्यामध्ये झाला. परिणामी शहरातील पाणीपुरवठ्यात कपात करण्याची वेळ महापालिकेवर आली होती. एकेकाळी शहराला पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव यंदा पूर्णपणे प्रथमच आटला. त्यामुळे तलावातील गाळ उपसा करून पाण्याची खोली जास्तीत जास्त निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न झाला. दुष्काळाची झळ कोल्हापूर शहरालाही प्रथमच बसली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राधानगरी धरणातील पाणीसाठाही कमी होऊ लागल्याने महापालिका प्रशासनाने १ एप्रिलपासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. पुढे राधानगरी धरणाने तळ गाठलाच; त्यामुळे १ जूननंतर तुळशी धरणाचा आधार महापालिकेला प्रथमच घ्यावा लागला; पण भविष्यात उद्भवणारी परिस्थिती विचारात घेऊन पाणीपुरवठा प्रशासनाने योग्य नियोजन केल्याने तशी पाणीटंचाईची झळ शहराला बसली नाही. दिवसाआड पाण्याचे नियोजन शहरवासीयांनीही अंगीकृत केले. त्यातून तक्रार उद्भवली नाही. दिवसाआड नियोजनामध्ये प्रतिदिनी किमान ८० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हा पुरेसा असल्याने हेच ‘दिवसाआड’ पाण्याचे नियोजन आॅगस्टअखेर ठेवून त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) रोज ८० एमएलडी उपसा : आतापर्र्यंत ४० एमएलडी पाण्याची बचत शहराला रोज पाणीपुरवठा सुरू असताना शिंगणापूर आणि बालिंगा येथील उपसा पंपांतून सुमारे १२० एमएलडी पाणीउपसा रोज करण्यात येत होता; पण दिवसाआड नियोजनानंतर रोज सुमारे ८० एमएलडी पाणीउपसा होऊन सुमारे ४० एमएलडी पाण्याची बचत होत गेली. पाण्यासाठी आंदोलने गायब गेल्या तीन वर्षांत पाण्यासाठी अवघी तीनच आंदोलने झाली. बापट कॅम्प, कसबा बावडा आणि मोरेवाडीनजीक अशा तीनच ठिकाणी पाण्यासाठी रास्ता रोको झाले. याशिवाय आॅनलाईन तक्रारीमध्ये कसबा बावडा येथील एका महिलेने तिसऱ्या मजल्यावर पाणी चढण्याइतके जादा दाबाने पाणी येत नसल्याची तक्रार सहा महिन्यांपूर्वी केली होती. याशिवाय पाण्यासाठीची आंदोलने लुप्त झाली आहेत. गेल्या तीन महिन्यांत दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असताना पाणीपुरवठ्याबाबत एकही तक्रार आलेली नाही. याचाच अर्थ सुमारे ८० एमएलडी पाणी शहरासाठी पुरेसे आहे. पाणीपुरवठा विभागाचे योग्य नियोजन व लोकांचे सहकार्य यामुळे टंचाई स्थितीतही पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य झाले. - मनिष पवार, जलअभियंता, महापालिका कोल्हापूर. एक दिवसाआड पुरवठ्यामुळे पाणी पुरवून वापरण्याची सवय लागली. ही व्यवस्था कायम चालू ठेवावी. पाणी बचतीचा हा चांगला मार्ग आहे. राज्यात अनेक शहरांत आठ दिवसांतून एकदा पाणी येते. आपण कोल्हापूरकर त्या तुलनेत भाग्यवान आहोत. पुरेसे पाणी मिळत असल्याने व्यवस्था बदलण्याची गरज नाही. - किरण भोसले, निवृत्त उपसंचालक, अल्पबचत.