शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

'महसूल'ची दादागिरी अमान्य

By admin | Updated: February 10, 2016 00:55 IST

हसन मुश्रीफ : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कागलमध्ये भीक मांगो आंदोलन

कागल : राज्यातील भाजप सरकार वेगवेगळ्या करांची व दंड आकारणी करून समाजातील कष्टकरी घटकांना आर्थिक त्रास देत पैसे गोळा करीत आहे. या शासनाला भीक लागल्याने ते गोरगरिबांच्या सेवासुविधा एकीकडे बंद करीत आहे, तर दुसरीकडे ठरवून पैसे वसुली करीत आहे, याचा निषेध करण्यासाठी आम्ही भीक मांगो आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल यंत्रणेद्वारे सामान्य लोकांवर सुरू केलेली दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. प्रशासनाची वसुलीची ही दादागिरी मुळासकट उपटून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी दिला.राष्ट्रवादी काँग्रेस कागल तालुक्याच्यावतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले. गैबी चौकातून बसस्थानकमार्गे मोर्चाने भीक मागत आंदोलक येथील तहसील कार्यालयासमोर आले. याप्रसंगी मुश्रीफ बोलत होते. भीक मागून आणलेल्या रकमेची खोकी नायब तहसीलदार सरस्वती पाटील व शिवाजीराव गवळी यांच्याकडे दिली. दरम्यान, मंगळवारी या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा देत कागलमध्ये व्यापाऱ्यांनीही कडकडीत बंद पाळला.मुश्रीफ म्हणाले, गेली दोन महिने भाजप शासन आर्थिक आघाडीवर डळमळत आहे. निराधार, अंगणवाडी सेविका, इतर घटकांबरोबरच नोकरांचे पगार वेळेवर देऊ शकत नसल्याने महसूल विभागामार्फत टार्गेट देऊन पैसे गोळा केले जात आहेत. कागल तालुक्याला पाच कोटींचे उद्दिष्ट आहे. यासाठी महसूल कर्मचारी यांच्याकडून वाळू, दगड, खडी काढणारे, बांधकाम करणारे यांना रात्री-अपरात्री पकडून दंड वसूल केला जात आहे. अकृषक कराच्या नावाखाली व्यापाऱ्यांवरही दंड आकारला जात आहे. म्हणून कागल बंद ठेवून हे आंदोलन केले. हा प्रकार त्वरित थांबावा; अन्यथा जनतेत उद्रेक होईल, असा इशाराही मुश्रीफ यांनी दिला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, जिल्हा लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, प्रकाश गाडेकर, शिवानंद माळी, संजय हेगडे यांची भाषणे झाली. आंदोलनात नगराध्यक्ष संगीता गाडेकर, प्रदीप पाटील-भुयेकर, बळवंतराव माने, प्रवीण भोसले, विकास पाटील, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)कागल बंदला प्रतिसादव्यापारी वर्गाला अकृषक कराची आकारणी सुरू केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी पुकारण्यात आलेल्या कागल बंदला उत्स्फू र्त प्रतिसाद लाभला. सकाळपासून दुकाने उघडली नाहीत. मात्र एस.टी., शाळा, महाविद्यालये, दवाखाने सुरू होते.चाकांची हवा सोडापोलिसांनी नोटीस देऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी तर प्रांत, तहसीलदार यांच्यावर वसुलीसाठी दबाव आणत आहेत. यापुढे जर कारवाईसाठी असे पथक आले तर त्यांच्या गाडीच्या चाकांची हवा सोडून गांधीगिरी मार्गाने आंदोलन करा. मारहाण, शिवीगाळ करू नका, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.