शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

झाडे जगविण्यासाठी डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे १५ टँकर; ऋतुराज पाटील यांचा पुढाकार : शेंडा पार्क पुन्हा हिरवागार होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:31 IST

कोल्हापूर : शेंडा पार्कातील आगीची झळ पोहोचलेली झाडे जगविण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून डी. वाय. पाटील ग्रुपकडून रोज पंधरा ...

कोल्हापूर : शेंडा पार्कातील आगीची झळ पोहोचलेली झाडे जगविण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून डी. वाय. पाटील ग्रुपकडून रोज पंधरा टँकरद्वारे झाडांना पाणी देण्याचे नियोजन केल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी मंगळवारी येथे सांगितले. या झाडांच्या संवर्धनासाठी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडून तात्काळ निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही आमदार पाटील यांनी दिली.

विविध स्वयंसेवी संस्था आणि युवकांच्या सहभागातून या झाडांचे मल्चिंग करण्याचा निर्णय झाला. मंगळवारी ‘लोकमत’मध्ये त्यासंदर्भातील वृत्त प्रसिध्द झाले होते व त्यासाठी समाजाच्या मदतीचा हात आवश्यक असल्याचे म्हटले होते.

शेंडा पार्कात आगीमुळे नुकसान झालेल्या झाडांची तासभर पाहणी करून त्यांनी संबंधित अधिकारी, पाचगाव, मोरेवाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या आगीची सुमारे २५ हजार झाडांना झळ पोहोचली असून लहान सुमारे ३ हजार झाडे पूर्णपणे जळाली, उर्वरित झाडांना जर पाणी दिले, तर ती झाडे जगातील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मोरेवाडी, पाचगाव ग्रामपंचायत सुद्धा पाणी देण्यासाठी सहकार्य करेल, असे आमदार पाटील यांनी सांगितले. जी ३ हजार झाडे जळाली आहेत, ती सामाजिक वनीकरण विभागाने पुन्हा नव्याने लावावीत, अशा सूचना त्यांनी केल्या.

आमदार पाटील यांनी पुढाकार घेतल्याने ही झाडे जगविण्यासाठी पाठबळ मिळेल, असे वृक्षप्रेमी संस्थेचे अमोल बुड्‌डे यांनी सांगितले. पाचगाव आणि मोरेवाडी ग्रामपंचायती सर्व सहकार्य करतील, अशी ग्वाही पाचगावचे सरपंच संग्राम पाटील आणि मोरेवाडीचे सरपंच दत्तात्रय भिलुगडे यांनी दिली.

कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता एस. आर. शिंदे, सहायक वन संरक्षक एम. बी. चंदनशिवे, उद्यान विभाग प्रमुख डॉ. एस. व्ही. सावंत, करवीरचे वनपाल एस. बी. देसाई यांच्यासह पाचगाव, मोरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य आणि वृक्षप्रेमी उपस्थित होते.

२९१२२०२०-कोल-शेंडा पार्क न्यूज

आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील शेंडा पार्क परिसरातील आगीमुळे नुकसान झालेल्या झाडांची मंग‌ळवारी पाहणी केली. यावेळी पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, मोरेवाडीचे सरपंच दत्तात्रय भिलुगडे आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.