शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
4
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
5
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
6
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
7
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
8
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
9
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
10
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
11
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
12
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
13
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
14
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
15
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
16
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
17
Priya Bapat: "छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
18
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
19
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
20
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!

बदनामी करणाऱ्यांवर वचक बसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2016 08:36 IST

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यालयाची रंगरंगोटी, डागडुजी, नूतनीकरण स्वखर्चाने केल्याचा कांगावा केला.

चित्रपटसृष्टीशी दुरान्वयानेही संबंध नसणारी, त्यांचे बगलबच्चे असणारी भाडोत्री माणसे आणून सर्वसाधारण सभेचे सभागृह खचाखच भरवले आणि त्यामध्ये आपल्या भूत-वर्तमान व भविष्यातील संभाव्य पापकर्मांचा पाढाच वाचला. कुणाशीही चर्चा न करता अधिकाराचा गैरवापर करून महामंडळाचे नावच बदलण्याचा घाट घातला. मात्र, ऐनवेळी महामंडळाचे माजी अध्यक्ष रामदास फुटाणे, भास्कर जाधव आणि यशवंत भालकर यांनी त्याला तीव्र विरोध केला. त्यावेळी उपस्थित असलेले तत्कालीन सांस्कृतिकमंत्री संजय देवतळे यांनी अध्यक्षांना समजावून सांगितले, पण त्यांनी कुणालाही न जुमानता अनावरण केले. त्यामुळे काळ््याकुट्ट इतिहासाची जखम चिघळली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यालयाची रंगरंगोटी, डागडुजी, नूतनीकरण स्वखर्चाने केल्याचा कांगावा केला. अहवालात या बाबींवर खर्च दाखविला. त्याचे गूढ अजूनही उकलले नाही. त्यानंतरच्या संयुक्त सर्वसाधारण सभेपूर्वी जेवणावळीचा खर्च महामंडळावर का? सर्वसाधारण सभेत भाडोत्री माणसे आणून राजकीय आखाडा निर्माण केला. सभेच्या सुरुवातीलाच त्या ‘अध्यक्ष, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है!’ या घोषणा सुरू होताच सभागृहाने त्याला हरकत घेतली. त्यामुळे अध्यक्षांनी सभागृहातच जाहीर दिलगिरी व्यक्त करून घोषणा देणाऱ्यांना सभागृहाबाहेर हाकलले. महामंडळांच्या नामकरणाचा विषय सभासदांवर लादण्याचा प्रयत्न करताच सभेने त्यास कडाडून विरोध करून नामकरण हाणून पाडले. जमा-खर्च आणि सभासदांच्या कोणत्याही प्रश्नावर अध्यक्ष समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. मनमानी करून सभा आटोपती घेण्याचा प्रयत्न अध्यक्ष करू लागताच, सभासद रणजित तथा बाळा जाधव यांनी पत्रांच्या उत्तरासाठी आग्रह धरताच उपाध्यक्षांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचे पर्यवसान माईक आपटून फोडण्यापर्यंत झाले. याला संपूर्ण कार्यकारिणीच जबाबदार नाही का? घटना दुरुस्ती मंजूर झाल्याचे सभेच्या एकूण गोंधळातच जाहीर करण्याचा प्रयत्न करून ही सभा जवळजवळ गुंडाळण्यातच त्यांनी धन्यता मानली. अखिल भारतीय चित्रपट महांमडळाची दुसरी सर्वसाधारण सभा बेकायदेशीरपणे बोलाविण्यात आलेली असल्यामुळे सभासदांनी सभाच रद्द करण्यास भाग पाडले. चित्रपट महामंडळाचा अनागोंदी कारभार, तत्कालीन अध्यक्षांची हुकूमशाही, भ्रष्टाचार या दुष्टचक्रातून महामंडळ वाचविण्यासाठी सभासद, निर्माते मेघराज राजेभोसले, सुरेंद्र पन्हाळकर आणि मी (अर्जुन नलवडे ) धर्मादाय आयुक्त यांच्याकडे विद्यमान संचालकांच्या चौकशीसाठी तक्रार अर्ज दावा दाखल केला. त्याबाबत त्यांनी विद्यमान संचालकांचे म्हणणे मागविले. देवाच्या खोट्या शपथेवर प्रतिज्ञा करणारे प्रमुख कार्यवाह व इतरांनी तत्कालीन अध्यक्ष व सहखजानिस यांनी महामंडळाची रक्कम स्वत:साठी वापरून संस्थेचे नुकसान केले. याबाबतची फिर्याद कोल्हापूर येथील न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात रे. क्रि. के. नं. ८२/२०१४ आणि दै. नं. १८९/१४ अन्वये दि. २१/०१/२०१४ रोजी जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत (अंतर्गत), इं. पि. को. क्र. ४०६, ४०८, ४२०, ४६६, ४७७/ए सह ३३४ प्रमाणे फौजदारी स्वरूपात दाखल केली आहे. तसेच सदर रक्कम वसुलीसाठी कोल्हापूर येथील मा. न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालयात दै. र. नं. २०५/२०/०१/१४ अन्वये दावा दाखल केला असून, तसे न्यायालयात प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. प्रत्यक्ष दोन्ही न्यायालयात एकाच विषयावर विसंगत प्रतिज्ञापत्र सादर करणे गंभीर आहे. संबंधित संचालकांवर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई होणे महामंडळाच्या भविष्यकालीन इतिहासाच्या दृष्टीने अत्यावश्यक नाही का?प्रमुख कार्यवाह व इतर काही संचालकांनी या कार्यालयात म्हणणे मांडताना संस्थेमध्ये कोणतेही गैरव्यवहार झालेले नाहीत, अनावश्यक कार्यासाठी खर्च करून आर्थिक नुकसान झालेले नाही, नियमावलीविरुद्ध बेकायदेशीर कृत्ये झालेली नाहीत, असे म्हणणे मांडून सदर न्यायालयात, संस्थेचे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही... असे म्हणणे, देवाच्या शपथेवर मांडून प्रमुख कार्यवाह यांनी न्यायालयाचा अवमान केलेला आहे.