शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

गळीत हंगाम सुरू, दराचा निर्णय अधांतरीच !

By admin | Updated: November 19, 2014 23:23 IST

शेतकरी संभ्रमात : सरकारच्या कोर्टात चेंडू, शेतकरी संघटनांतही एकी नाही

आयुब मुल्ला- खोची -कोल्हापूर जिल्ह्यातील पाच कारखाने वगळता सर्व कारखान्यांनी गळीत हंगामास सुरुवात केली आहे. यापैकी शाहू (कागल), गुरुदत्त (टाकळीवाडी) यांनी अनुक्रमे २५३० व २५०० रुपये पहिली उचल जाहीर केली. अन्य कारखान्यांनी मात्र पहिली उचल जाहीर न करता हंगामाची सुरुवात केली आहे. एफआरपीचा चेंडू शासनाच्या कोर्टात असून, त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे एफआरपीसाठी काय तोडगा निघणार व ऊस तुटल्यानंतर १४ दिवसांत एकरकमी शेतकऱ्यांना पैसे मिळणार का, या संभ्रमात शेतकरी आहे. एकीकडे बहुतांश कारखाने सुरू होऊन दोन आठवडे झाली आहेत. मग नियमाचे काय, हा मुद्दासुद्धा उपस्थित होतो.ऊस नियामक समितीची बैठक दोन दिवसांपूर्वी मुंबईत झाली. पण त्यामध्ये ठोस निर्णय झाला नाही. पुन्हा यासंदर्भात समितीची बैठक होणार आहे. निर्णयाला विलंब लागत असला तरी कारखाने धडाक्यात हंगाम सुरू करीत आहेत. राज्याचा विचार करता उचल जाहीर न करता निम्म्या कारखान्यांनी सुमारे तीस लाख टन उसाचे गाळप केले आहे. आता शेतकरीही तोडणीस विरोध करताना दिसत नाही. कारण सरकार, संघटना, कारखानदार यांच्यावर विश्वास ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.ऊस दराची मागणी पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी २७०० रुपये, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी ३५०० रुपये, किसान सभेने ३००० रुपये, तर बळिराजा संघटनेने ३५०० रुपये केली आहे. नियामक समितीच्या बैठकीत सदस्यांनी आपल्या भूमिका मांडल्या. परंतु, हा निर्णयच आता सरकारच्या हाती गेला आहे. त्यामुळे खरी कसोटी पहायला मिळणार आहे, ती सरकारची.राज्य सरकारी बँकेने चालू वर्षी साखरेचे प्रतिक्विंटल मूल्यांकन केले आहे. चालू महिन्यासाठी ते २६३० रुपये आहे. त्यातील ८५ टक्के कर्ज म्हणजे २२३५ रुपये कारखान्यांना मिळणार आहेत. यामध्ये तोडणी वाहतूक व उत्पादन खर्च आदी वजा जाता पंधराशे रुपयांच्या आसपास पहिली उचल कारखाने देऊ शकतात, असे गणित समोर येते. मग संघटनांची मागणी व एफआरपीनुसार होणारे दर यामध्ये चार आकड्यांचा (बाराशे ते दोन हजार) इतका फरक पडतो. तो मिळताजुळता करण्याची वेळ सरकारवर आली आहे. एकीकडे एफआरपीनुसार दर व १४ दिवसांची पैसे मिळण्याची मुदत असा नियम आहे. तर दुसरीकडे कारखाने सुरु होऊन पंधरवडा गाठत आला अशी स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण होणे साहजिकच आहे.विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा चांगला आहे. सन २०१३-१४ चा उतारा १२.८४ आहे. याचा विचार करता चांगला दर मिळणे इथल्या शेतकऱ्याला अपेक्षित आहे. ..गळितात आघाडी जिल्ह्यातील वारणा, दौलत, उदयसिंगराव गायकवाड, इंदिरा महिला, भोगावती या कारखान्यांच्या गळीत हंगामास अद्याप वेग आलेला नाही. तर शाहू (कागल), छत्रपती राजाराम (क. बावडा), सदाशिवराव मंडलिक (हमिदवाडा), शरद (नरंदे), डॉ. डी. वाय. पाटील, कुंभी-कासारी (कुडित्रे), दूधगंगा (बिद्री), गुरुदत्त शुगर्स (टाकळीवाडी), जवाहर (हुपरी), दत्त (शिरोळ), दालमिया शुगर्स या कारखान्यांनी मात्र हंगाम सुरूकरून गळितात आघाडी घेतली आहे.