शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

बचत गटांची कोटीची उलाढाल

By admin | Updated: January 15, 2015 00:12 IST

राज्यस्तरीय प्रदर्शन : तीन दिवसांनंतर गर्दीने झाली सांगता; १०५ गटांचे स्टॉल

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या आवारात गेले तीन दिवस सुरू असलेल्या राज्यस्तरीय प्रदर्शनाची आज, बुधवारी गर्दीनेच सांगता झाली. या प्रदर्शनात तब्बल १०५ बचत गटांचे स्टॉल सहभागी झाले होते. तीन दिवसांत प्रदर्शनात तब्बल एक कोटीची उलाढाल झाली. या प्रदर्शनात विविध जिल्ह्यांतील बचत गटांनी बनविलेल्या विविध वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. शेळेवाडी (ता. करवीर) येथील बचत गटाने महिला दूध संकलन सुरू केले असून, सभासदांना सहा टक्के लाभांश देऊन इतरांसमोर आदर्श ठेवला आहे. सामुदायिक शेती, तसेच कृषी विभागाकडून ९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर अवजारांसह मिळाले आहेत. या बचत गटाचे ‘नाबार्ड’च्या अधिकाऱ्यांनी कौतुक केले. बेलवळे (ता. कागल) येथील भावेश्वरी बचत गटाच्या वतीने रेशन दुकान, रॉकेल डेपो, खत विक्री, बी-बियाण्यासह कीटकनाशकांची विक्री केली जाते. अशी विक्री करणारा राज्यातील हा एकमेव बचत गट असल्याचे गौरवोद्गार अधिकाऱ्यांनी काढले. प्रदर्शनात सावंतवाडीची लाकडी खेळणी, रत्नागिरीचे काजू, सांगोल्याची घोंगडी, नाशिकची पैठणी, आजऱ्याचा घनसाळ, कोल्हापुरी चप्पल या उत्पादनांनी विशेष गर्दी खेचली. आज प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने ग्राहकांनी तुडुंब गर्दी केली होती. प्रदर्शनाला रायगड जिल्हा बॅँकेच्या अधिकारी प्रा. अंजली पाटील, भरत दैनी, प्रवीण सूर्यवंशी, एम. डी. पाटील, डॉ. एम. व्ही. कुलकर्णी, आदींनी भेट दिली. तीन दिवस चाललेल्या प्रदर्शनात एक कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. सहभागी बचत गटांना जिल्हा बॅँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.गीता पाटील यांनी चालविला ट्रॅक्टरशेळेवाडी (ता. राधानगरी) येथील बचत गटाच्या अध्यक्ष गीता पाटील यांनी ट्रॅक्टर अवजारासह चालवून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले. महिलाही काही कमी नसल्याचे त्यांनी दाखवून दिल्याने उपस्थितांनी बचत गटांचे कौतुक केले.