शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दत्तवाड येथे घोड्यावर मगरीचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:27 IST

दत्तवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील दूधगंगा नदीत एका महाकाय मगरीने घोड्यावर हल्ला केला. यामध्ये सुदैवाने घोड्याचा मालक या ...

दत्तवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील दूधगंगा नदीत एका महाकाय मगरीने घोड्यावर हल्ला केला. यामध्ये सुदैवाने घोड्याचा मालक या हल्ल्यातून बचावला. मगरीने घोड्याला ओढत नदीपात्रात नेले. यामध्ये शेतकऱ्याचे ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, तलाठी अश्विनी खराडे, पोलीस पाटील संजय पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.

येथील शेतकरी आण्णाप्पा शिरढोणे हे रविवारी दुपारी घोड्याला धुण्यासाठी दूधगंगा नदीपात्रात गेले होते. यावेळी अचानकपणे मगरीने त्यांच्यावर हल्ला केला. शिरढोणे यांनी तेथून पळ काढला. मात्र, मगरीच्या हल्ल्यात घोडा सापडला. मगर त्या घोड्याला ओढत नदीपात्रात घेऊन गेली.

नदीपात्रात मोठ्या प्रमाणात महिला धुणे धुण्यासाठी जात असतात. त्यामुळे ग्रामस्थांसह महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. दूधगंगा नदीवरील घोसरवाड बंधारा ते दत्तवाड येथील कोटलिंग भाग या परिसरात जवळपास दहा ते पंधरा मगरींचा वावर आहे. यापूर्वीदेखील एका गाईच्या खोंडावर मगरीने हल्ला केला होता. तसेच मेंढ्या व पाणी पिण्यासाठी नदीकाठावर गेलेल्या कुत्र्यावर देखील मगरीने हल्ला केला आहे.

नदीकाठाजवळ गवती कुरण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी ये-जा करतात. तसेच मासेमारीसाठी देखील मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ येत असतात. तसेच गवताच्या कुरणात अनेक शेतकरी गवत कापण्यासाठी दररोज जात असतात. शिवाय मासेमारीसाठी देखील अनेक नागरिक जातात. त्यामुळे या मगरींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.