शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शिंगणापूर परिसरातील ‘ते’ गवे जंगलात परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:25 IST

कोल्हापूर : शिंगणापूर परिसरात रविवारी सकाळी आढळलेले तीन गवे सोमवारी पहाटे जंगलात परतले असल्याची माहिती करवीरचे वनक्षेत्रपाल ...

कोल्हापूर : शिंगणापूर परिसरात रविवारी सकाळी आढळलेले तीन गवे सोमवारी पहाटे जंगलात परतले असल्याची माहिती करवीरचे वनक्षेत्रपाल सुधीर सोनावणे यांनी दिली.

शिंगणापूर परिसरात उसाच्या शेतात तीन गवे आढळले होते. दोनच दिवसांपूवी लक्षतीर्थ वसाहत व उत्तरेश्वर पेठेत पाच गव्यांचा शेतात मुक्काम होता. दरम्यान, शिंगणापूर परिसरात तीन गवे रविवारी दिवसभर उसाच्या शेतात आढळून आले होते. दोन मादी गव्यांसह तीन गवे या ठिकाणी होते.

करवीर वन विभागाच्या दोन पथकाला या गव्यांना पहाटे अडीच वाजण्याच्यासुमारास जंगलाकडे परत पाठविण्यास यश आले. या पथकामध्ये वीसजणांचा समावेश होता.

उपवनसंरक्षक आर. आर. काळे, करवीरचे वन अधिकारी सुधीर सोनावणे, वनपाल प्रवीण पाटील, वनपाल घनश्याम भोसले, वन्यजीव संक्रमण व उपचार केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर यांच्यासह त्यांचे आठजणांचे पथक, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲन्ड रिसर्च सोसायटीचे पाचजण, बावडा रेस्क्यू फोर्सचे पाचजण तसेच सह्याद्री डिझास्टर, करनूरचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यासह व्हाईट आर्मीच्या जवानांनी प्रयत्न करून या गव्यांना जंगलाकडे परत पाठविण्याची कामगिरी यशस्वीपणे पार पाडली. दिवसभरात परत गवे आढळले नसल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.

स्थानिकांचे सहकार्य

या गव्यांना जंगलात परत पाठविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी वन विभागाला सहकार्य केले. सरपंच तसेच शेतकऱ्यांनी सहकार्याचा हात दिला. गवे दिसल्यास वन विभागाला तत्काळ कळविण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.

(संदीप आडनाईक)