शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

कोथिंबिरीच्या पेंढ्या पाचला दोन !

By admin | Updated: February 20, 2017 00:20 IST

उपवासाच्या पदार्थांना मागणी : आठवडाभरात भाज्यांच्या दरामध्ये किंचितशी वाढ

कोल्हापूर : इतरवेळी ग्राहक बाजारातून कोथिंबिरीची पेंढी २५ किंवा १५ रुपयांना याप्रमाणे आणतो; पण कोल्हापुरातील रविवारच्या आठवडी बाजारात ‘पाच रुपयांना दोन कोथिंबिरीच्या पेंढ्या,’ असा आवाज कानांवर पडताच, तिथे कोथिंबिरीची पेंढ्या घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाल्याचे चित्र होते. त्यातच शाबू, वरीसह उपवासाच्या अन्य पदार्थांनाही मागणी वाढली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात भाज्यांच्या दरात किंचितशी वाढ होऊ लागली आहे. नोटाबंदीच्या काळात भाज्यांचे दर अक्षरश: कोसळले होते. हे दर सरासरी २० रुपये प्रतिकिलोच्या घरात गेले होते. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात ढबू मिरची, गवार, वरणा, काकडी, दुधी भोपळा, पडवळ, पोकळा, बीट व कांदापातीच्या दरांमध्ये किंचितशी वाढ झाली आहे; तर वांगी, भेंडी, दोडका, रताळी, शेवग्याची शेंग, माईनमुळ्याचे दर उतरले आहेत.त्याचबरोबर कांदा-बटाट्याचे दर स्थिर आहेत. कांद्याचा दहा किलोंचा दर ६५, तर बटाटा ८० रुपयांच्या जवळपास गेला आहे; पण लसणाचा दर तब्बल ३०० रुपयांनी कमी होऊन ६०० रुपये झाला आहे. दुसरीकडे, उडीदडाळ ९० वरून १०० रुपये प्रतिकिलो झाली आहे. हरभराडाळ ८० वरून ९० रुपये झाली. महाशिवरात्र असल्यामुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. शाबू ८० वरून ९० रुपये प्रतिकिलो; तर वरी ८० रुपये झाली आहे. तसेच राजगिरा लाडू या उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे.दरम्यान, मोेसंबी, माल्टा, संत्री, सफरचंद, अंजीर, अननस, कलिंगडे, बोरे, पपई, कैरी, किव्ही, रामफळ, स्ट्रॉबेरी व हापूस आंब्यांत वाढ, तर चिकू उतरला आहे.