शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे राज्य नाट्य स्पर्धा रद्द होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:48 IST

इंदुमती गणेश, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना संसर्गाची भीती आणि निधीची कमतरता यामुळे राज्य नाट्य स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच ...

इंदुमती गणेश,

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोना संसर्गाची भीती आणि निधीची कमतरता यामुळे राज्य नाट्य स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच ही रद्दच होण्याची शक्यता आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केवळ मागील वर्षीची अर्धवट राहिलेली हिंदी राज्य नाट्य स्पर्धा पूर्ण करण्यास परवानगी दिली आहे. त्यात आता वर्ष संपायला तीन महिने राहिल्याने स्पर्धा होण्याची शक्यता धूसर आहे.

नाट्य परंपरा जोपासण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेेचे आयोजन केले जाते. हौशी, व्यावसायिक, हिंदी, संस्कृत, संगीत राज्य नाट्य, बालनाट्य अशा वेगवेगळ्या विभागांत ही स्पर्धा राज्यातील विविध प्राथमिक केंद्रांवर रंगते. नंतर अंतिम स्पर्धा होते.

यंदा मात्र कोरोनामुळे सांस्कृतिक क्षेत्रात अजूनही अनलॉक झालेला नाही. शासनाने नियमांचे बंधन घालून नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी राज्य नाट्यबद्दल निर्णय घेतलेला नाही.

वेळ पुढे गेली

स्पर्धेचा आवाका मोठा असल्याने ऑगस्टमध्ये स्पर्धेला सुरुवात होते. एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्षात मार्चअखेर अंतिम स्पर्धा संपून पारितोषिक वितरण होते. सात महिन्यांचा कालावधी यात जातो. आता मोठ्या शैक्षणिक नुकसानीनंतर शाळा महाविद्यालये सुरू होत आहेत. शिवाय स्पर्धेसाठी केवळ तीन महिने राहिल्याने आयोजन आणि संघांची तयारी होणे अवघड आहे.

१९ केंद्र साडेसातशे नाटके

राज्यात राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १९ केंद्रांवर होते. प्रत्येक केंद्रावर किमान १८ नाटके याप्रमाणे साडेतीनशे नाटके प्राथमिक फेरीत सादर होतात. बालनाट्य स्पर्धेत २०० च्यावर, संगीत राज्य नाट्यमध्ये ५०, संस्कृतची ३५ ते ४० आणि हिंदी राज्य नाट्यमध्ये किमान ६० प्रवेशिका असतात. यानुसार या विविध विभागांतील स्पर्धेत साडेसातशेवर नाटके सादर होतात आणि या चळवळीशी १५ ते २० हजारांवर कलावंत आणि तंत्रज्ञ जोडलेले आहेत.