शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आई-बाबा फौंडेशनतर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:05 IST

यावेळी मानपत्र, चांदीची मुद्रा देऊन कोरोना योद्ध्यांना गौरविण्यात आले. नगराध्यक्षा प्राची काणेकर यांनी स्वागत केले. स्वत:सह कुटुंबातील १४ जण ...

यावेळी मानपत्र, चांदीची मुद्रा देऊन कोरोना योद्ध्यांना गौरविण्यात आले. नगराध्यक्षा प्राची काणेकर यांनी स्वागत केले. स्वत:सह कुटुंबातील १४ जण पॉझिटिव्ह आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या प्रकारे रुग्णसेवा केली, त्या घटनेने भारावून आपण आई-बाबा ट्रस्टची स्थापना केल्याचे काणेकर यांनी सांगितले.

आमदार पाटील म्हणाले, आई-बाबा ट्रस्टच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम काणेकर कुटुंबीयांनी केले आहे. नगरपंचायतीसाठी मिळविलेल्या पाच कोटी ६५ लाखांच्या विकास निधीचेही समसमान वाटप करून काणेकर यांनी नि:स्वार्थ वृत्ती जपण्याचे दुर्मीळ काम केले आहे. माजी मंत्री भरमू पाटील, सभापती अ‍ॅड. अनंत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी डॉक्टर्स, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, आरोग्य कर्मचारी, खासगी डॉक्टर्स, पत्रकार, आदींचा मानपत्र देऊन गौरव झाला.

यावेळी उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, तहसीलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे, नगरसेवक दिलीप चंदगडकर, सचिन नेसरीकर, अ‍ॅड. विजय कडूकर, अरुण पिळणकर, शिवानंद हुंबरवाडी, बाबूराव हळदणकर, राजेंद्र परीट, आदी उपस्थित होते. एम. टी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. संजय चंदगडकर यांनी आभार मानले.

------------------------

फोटो ओळी :

चंदगड येथे आई-बाबा फौंडेशनतर्फे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत यांचा आमदार राजेश पाटील यांनी सत्कार केला. यावेळी तहसीलदार विनोद रणवरे, नगराध्यक्षा प्राची काणेकर, दयानंद काणेकर, सभापती अनंत कांबळे, आदी उपस्थित होते.

क्रमांक : २४०१२०२१-गड-०४