शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

मधेच बंद पडणाऱ्या संगणकावर कोरोनाचे अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST

कोल्हापूर : गेले १४ महिने कोरोनाच्या आकडेवारी संकलनाचे शिवधनुष्य पेलणाऱ्या जिल्हा परिषदेतील साथरोग कक्षाला जुन्याच संगणकावर काम करावे लागत ...

कोल्हापूर : गेले १४ महिने कोरोनाच्या आकडेवारी संकलनाचे शिवधनुष्य पेलणाऱ्या जिल्हा परिषदेतील साथरोग कक्षाला जुन्याच संगणकावर काम करावे लागत आहे. चार महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेत दीड कोटी रुपयांचे १६८ संगणक आणि प्रिंटर खरेदी करण्यात आले; परंत त्यातील पाच संगणक या विभागाला द्यावे, असे कोणत्याच अधिकाऱ्याला वाटले नाही ही खेदाची बाब आहे.

जिल्हा परिषदेत एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प हा स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. जिल्ह्यातील साथ रोगाबाबतच्या सर्वेक्षणाचे, आकडेवारी संकलनाचे काम या विभागाकडून केले जाते. कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून लाखो अहवालांच्या विश्लेषणापासून तशी आकडेवारी तयार करण्याचे महत्त्वाचे काम या ठिकाणाहून करण्यात येते. साथरोग तज्ज्ञ आणि डाटा ऑपरेटर असे सात जण येथे कार्यरत आहेत.

गेल्या वर्षीपासून सकाळी ९ वाजल्यापासून ते रात्री बारा, एकपर्यंत ही मंडळी संगणकावर काम करत आहेत. संकलित केले जाणारे स्वॅब, त्याचे आलेले अहवाल, वय, लिंग, ठिकाण यानुसार या सर्व रुग्णांचे वर्गीकरण, मृत्यूच्या आकड्यापासून त्यांचे वय, लिंग, ठिकाण, आजार यांनुसार वर्गीकरण ही सर्व कामे या विभागाकडून केली जातात.

बाराही तालुक्यातून भरलेली आकडेवारी संकलित करून ती कोविड पोर्टलवर भरण्याचीही महत्त्वाची कामगिरी येथून पार पाडली जाते. त्यामुळे गेले १४ महिने रात्रंदिवस या विभागामध्ये काम सुरू आहे; परंतु या ठिकाणी जे सात संगणक आहेत, ते २०१०, २०११, २०१२ मधील आहेत. जुन्या संगणकावर काम करताना येथील अधिकारी, कर्मचारी हैराण झाले आहेत. अनेकदा मधेच संगणक बंद पडत आहेत. याबाबत वारंवार सांगूनही नवे संगणक मिळालेले नाहीत. आत्ताच ६ मे रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनीही आरोग्य उपसंचालकांना पत्र लिहून तीन नव्या संगणकांची मागणी केली आहे.

चौकट

सादरीकरणाची रात्री-अपरात्री तयारी

या १४ महिन्यांमध्ये आरोग्यमंत्री, जिल्ह्यातील तीनही मंत्री, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांचे अनेक दौरे कोल्हापूर जिल्ह्यात झाले आहेत. त्यावेळी जे सादरीकरण करण्यात येते. त्याची तयारी याच कक्षाकडून केली जाते. परंतु त्यांना या जुन्या संगणकांच्या आधारेच हे काम करावे लागत आहे. एवढेच नव्हे तर प्रसारमाध्यमांना देण्यात येणारी प्रेसनोटही येथूनच तयार केली जाते.

चौकट

दीड कोटीतील एकही संगणक दिला नाही

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडील दीड कोटी रुपयांमधून १६८ संगणक आणि प्रिंटरची खरेदी करण्यात आली. त्यातील चार, पाच संगणक या आकडेवारी आणि तक्त्यांचे काम करणाऱ्या विभागाला द्यावेत, असे कुणालाही वाटले नाही.