शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

हुपरीतील एका नेत्यास कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:22 IST

हुपरी : हुपरी(ता. हातकणंगले) नगरपरिषदेतील एका पक्षाच्या पक्षप्रतोदांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. गुरुवारी व शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज, ...

हुपरी : हुपरी(ता. हातकणंगले) नगरपरिषदेतील एका पक्षाच्या पक्षप्रतोदांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. गुरुवारी व शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळा, रमजान ईद, तसेच शहरातील अन्य कार्यक्रमांतही या पदाधिकाऱ्याचा सक्रिय सहभाग राहिला आहे. या सर्वच समारंभात नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांच्यासह सर्व नगरसेवक, अधिकारी व संयोजक त्यांच्या सोबत होते. त्यामुळे या सर्वांवरती क्वारंटाईन होण्याची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

माळभागावरती वास्तव्यास असणाऱ्या या पदाधिकाऱ्यांस गेल्या चार दिवसांपासून त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांपूर्वी आरटीपीसीआर तपासणीसाठी आपला स्वॅब दिला होता. तब्येत बिघडलेली असताना व तपासणीसाठी स्वॅब दिलेला असतानाही या पदाधिकाऱ्यांने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज जयंती, रमजान ईदसह शहरातील इतरही समारंभात उपस्थिती लावली होती. त्यामुळे या समारंभात उपस्थित असणाऱ्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत. नगरपरिषद कार्यालयाच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात आलेल्याची यादी तयार करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. खबरदारी म्हणून नगराध्यक्षा जयश्री गाट, मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार यांच्यासह सर्व नगरसेवक, अधिकारी, कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे समजते.