शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळ तालुक्यात कोरोनाची मगरमिठ्ठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:26 IST

संदीप बावचे : जयसिंगपूर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र, संचारबंदीच्या काळात शिरोळ तालुक्यातील रुग्णसंख्या बाराशेवर पोहोचली ...

संदीप बावचे : जयसिंगपूर

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र, संचारबंदीच्या काळात शिरोळ तालुक्यातील रुग्णसंख्या बाराशेवर पोहोचली आहे. कडक निर्बंध लागू होऊनही रुग्णसंख्या कमी झालेली नाही. त्यामुळे तालुक्यात चिंता वाढली आहे. एप्रिल महिन्यात ग्रामीण भागात ५९१, तर मेच्या पहिल्या आठवड्यात आणखी ७०९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाची मगरमिठी ग्रामीण भागात थांबायला तयार नाही, असेच चित्र सध्या तरी दिसत आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एप्रिलपासून शिरोळ तालुक्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला होता. एक महिन्यात ८६४ रुग्णांची नोंद झाली होती. यामध्ये शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड परिसरात २७३, तर तालुक्यातील ५२ गावांत ५९१ रुग्णांची नोंद झाली आहे. २८ जणांचा कोरोनामुळे मृत्यूदेखील झाला आहे. संचारबंदी लागू केल्यामुळे रुग्णसंख्या कमी होईल, अशी आशा होती.

मात्र, मेच्या पहिल्या आठवड्यात ही संख्या दुप्पट झाली आहे. ६ मे अखेर शहरी भागात ४५९, तर ग्रामीण भागात ११९४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी आणखी १०६ रुग्ण वाढले आहेत. रोज रुग्णांची भर पडत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. गंभीर रुग्णांची संख्या वाढल्यामुळे ऑक्सिजन, रेमडेसिविर अपुरे पडू लागले आहेत. नातेवाइकांची धावपळ सुरू आहे. सध्या तरी रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. रुग्ण बरे होत असले तरी प्रशासनाने आणखी कडक नियम करण्याची गरज आहे.

---

चौकट - सहा दिवसांत दुप्पट रुग्ण

गेल्या एप्रिल महिन्यात ८६४ रुग्णांची नोंद झाली होती; परंतु ६ मेअखेर रुग्णसंख्या वाढून दुप्पट झाली असून ती १७६१ वर पोहोचली आहे. दोन दिवसांत तब्बल ४१४ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनासमोर ही चिंतेची बाब ठरत आहे.