शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

समन्वयातून शहराचा विकास साधणार

By admin | Updated: April 6, 2017 00:51 IST

अभिजित चौधरी : महापालिका पदाधिकाऱ्यांनी, नगरसेवकांना दिली ग्वाही

कोल्हापूर : प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून शहराचा विकास करण्याची ग्वाही आयुक्त अभिजित चौधरी यांनी बुधवारी महानगरपालिका पदाधिकारी व नगरसेवकांना दिली. यावेळी आयुक्त चौधरी यांनी नगरसेवकांच्या अपेक्षा आणि सूचना ऐकून घेतल्या. महापालिकेतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी बुधवारी दुपारी आयुक्त चौधरी यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये महानगरपालिकेची नवीन इमारत बांधणे, रखडलेले बीओटी प्रकल्प पूर्णत्वास नेणे, बीओटी प्रकल्पास प्रतिसाद मिळत नसेल तर प्रकल्प महापालिकेने स्वत: विकसित करून उत्पन्न मिळविणे, उत्पन्नवाढीचे नवीन स्रोत निर्माण करणे, महिला नगरसेविकांचे प्रमाण ५० टक्के आहे. त्यामुळे त्यांच्या प्रभागातील कामांना प्राध्यान्य देणे, आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.कोणताही नवीन कर बसवायचा असल्यास प्रथम कोल्हापुरात राबविला जातो. नागरिकही असा कर भरणारे आहेत. याकरिता शहरातील नवीन मिळकतींचा शोध घ्यावा यातून घरफाळ्याच्या उत्पन्नात वाढ होईल, अशी सूचनाही नगरसेवकांनी केली. उपमहापौर अर्जुन माने, गटनेता शारंगधर देशमुख, नगरसेवक जयंत पाटील, महेश सावंत, नगरसेविका सूरमंजिरी लाटकर यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी महिला बालकल्याण समिती सभापती वहिदा सौदागर, प्राथमिक शिक्षण समिती सभापती अजिंक्य चव्हाण, सभागृहनेता प्रवीण केसरकर, प्रभाग समिती सभापती अफजल पिरजादे, गटनेता सुनील पाटील, नगरसेवक सुभाष बुचडे, संदीप कवाळे, श्रावण फडतारे, सचिन पाटील, मुरलीधर जाधव, नगरसेविका नीलोफर आजरेकर, शमा मुल्ला, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, प्रकाश गवंडी, विनायक फाळके, आदी उपस्थित होते. बदली होऊन गेलेले पी. शिवशंकर यांचे आणि विद्यमान पदाधिकारी व नगरसेवक यांच्यात नेहमी खटके उडत राहिल्यामुळे प्रशासनात शिथिलता आली होती. विकासकामांना खीळ बसली होती. अधिकारीही दबावाखाली होते. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे. (प्रतिनिधी)