शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सहकारातील जुन्या दुखण्यांच्या वेदना कायमच

By admin | Updated: December 24, 2014 00:18 IST

न्यायालयात तारखा द्याव्यात तशा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे प्रत्येक पत्रकार परिषदेत नवी तारीख देत होते. अखेर एप्रिलमध्ये हे प्राधिकरण अस्तित्वात आले.

सहकार क्षेत्रासाठी मागचे वर्ष काही निश्चित चांगल्या गोष्टी घेऊन आले परंतु काही जुनी दुखणी मात्र अजूनही ठसठसत आहेत. त्यावर उपाय करायला शासन तयार नाही. सरकार कोणतेही असले तरी त्याकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे राजकीय इच्छाशक्ती नाही. अधिसूचना काढून नवा सहकार कायदा अगोदरच लागू केला असला तरी महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम २०१४ हा कायदा १४ फेब्रुवारीपासून लागू झाला. त्याअंतर्गत स्थापन होणारे सहकार निवडणूक प्राधिकरण स्थापन करण्यास काँग्रेस सरकारला सवड मिळाली नव्हती. न्यायालयात तारखा द्याव्यात तशा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे प्रत्येक पत्रकार परिषदेत नवी तारीख देत होते. अखेर एप्रिलमध्ये हे प्राधिकरण अस्तित्वात आले. मधुकर चौधरी यांची प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्याची नियमावली लागू झाली आहे. राज्यभरातील तीस हजार संस्थांची निवडणूक प्रक्रिया या प्राधिकरणाने सुरू केली आहे. त्यातील सुमारे दहा हजारांवर संस्थांच्या निवडणुका झाल्या आहेत. आतापर्यंत अनेक संस्थांच्या निवडणुका कधी व्हायच्या हेच कळत नव्हते. त्यामुळे अनेक संस्थांवर ठराविक लोकांची मक्तेदारी झाली होती. ती मोडण्यास प्राधिकरणामुळे मदत झाली आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येण्यास मदत झाली आहे.यंदाच्या वर्षातील सहकार क्षेत्रातील सगळ््यात चांगले काम कोणते असेल तर ते महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम २०१४ हा नवा कायदा लागू केला. मुळचा हा कायदा १९४६ चा. परंतु तो शेतकरी हिताचा नव्हता, त्यामुळे त्यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. शेतकऱ्यांच्या सावकाराकडील जमिनी सोडवून देण्यासंदर्भातील दावे यापुढे जिल्हा उपनिबंधकांकडे चालणार आहेत. या कायद्याने जिल्हा उपनिबंधकांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार देण्यात आले आहेत. राज्यात परवानाधारक ११ हजार सावकार आहेत. परंतु विनापरवाना खासगी सावकारी करणाऱ्यांची संख्या मुख्यत: विदर्भ व मराठवाड्यात जास्त आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे ते देखील महत्त्वाचे कारण आहे. या नव्या कायद्यानुसार विनापरवाना सावकारी करताच येणार नाही. दुसरे असे की १९९९ पासून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराने बेकायदेशीरपणे बळकावल्या आहेत, त्यांच्या जमिनी परत देण्याची मोहीमही सहकार खात्याने हाती घेतली आहे. त्याशिवाय सावकारी व्याजाचा दरही निश्चित केला आहे. ९ टक्के तारण कर्जास व १२ टक्के विनातारण कर्जास व्याज घेता येईल. नाबार्डच्या योजनेनुसार शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीककर्ज पुरवठा केला जातो. त्यामुळे सेवा संस्था व जिल्हा बँकाही अडचणीत आल्या. त्यांना आता सरकारच एक लाखापर्यंतची मदत येत्या वर्षापासून करणार आहे. राज्यात ३१ जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत. त्यातील नागपूर, वर्धा, बुलडाणा यांचा परवाना रिझर्व्ह बँकेने गोठवला असल्याने त्या ९ मे २०१४ पासून बंद आहेत. त्यांच्या भागभांडवलासाठी आता केंद्र शासनच मदत करणार आहे. उर्वरित किमान २२ बँका आता निवडणुकीसाठी पात्र आहेत. नव्या वर्षात त्या बँकांच्या निवडणुकांचा बार उडणार आहे. या काही चांगल्या गोष्टी झाल्या तरी रूपी व पेण बँकेच्या विलीनीकरणाबाबत शासनाला कोणताच निर्णय घेता आला नाही. राज्यभरातील बंद पडलेल्या पतसंस्थांतील ठेवीदारांवर अक्षरक्ष: टाचा घासण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारला चपराकपणन खात्याचे संचालक सुभाष माने व राज्य सरकार यांच्यातील वादही गाजला. त्यांच्या निलंबनावरून न्यायालयाने राज्य सरकारला चपराक मारली. बाजार समित्यांतील अडत रद्द करण्याचा शेतकरी हिताचा निर्णय सुभाष माने यांनी घेतला परंतु व्यापाऱ्यांच्या दबावास बळी पडून सरकारला त्यास स्थगिती द्यावी लागली. विश्वास पाटील