शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोअर बँकिंगची सोय

By admin | Updated: February 13, 2015 00:54 IST

दहा पोस्ट कार्यालये : आता पोस्टाच्या ग्राहकांनाही मिळणार बँकांप्रमाणेच सेवा

कोल्हापूर : जिल्ह्यातील दहा पोस्ट कार्यालयांत खातेदारांसाठी आॅनलाईन (कोअर बँकिंग) सेवा सुरू करण्यात आली. या सेवेमुळे देशातील कोणत्याही पोस्ट कार्यालयातील बचतीसह अन्य बँकिंगचे व्यवहार या कार्यालयामार्फत केले जाणार आहेत. त्यामुळे पोस्टाच्या ग्राहकांना आता बँकांप्रमाणे अत्याधुनिक सेवेचा लाभ घेता येणार आहे. या सेवेचा लाभ कोल्हापुरातील लाखो ग्राहकांना होणार आहे. भारत सरकारच्या नवीन उपक्रमांतर्गत देशातील सर्वच्या सर्व १,५५,००० पोस्ट कार्यालयांतून बचत बँकेची सेवा आॅनलाईन (कोअर बँकिंग सेवा) सुरू करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पोस्ट कार्यालयांत ही सेवा सुरू करण्यात आली. या सेवेद्वारे येत्या काही दिवसांत एटीएम सेवाही पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे पोस्टाच्या ग्राहकांना बँकांप्रमाणेच सर्व अत्याधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत. येत्या काही दिवसांत एटीएम सेवाही चालू केल्यानंतर मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग या सेवाही सुरू करण्यात येणार आहेत. या सेवेत बँकेप्रमाणेच ग्राहकांना दहा अंकी आयडी क्रमांक दिला जाणार आहे. हा आयडीच सर्वत्र उपयोगी पडणार आहे. गोवा क्षेत्रीय कार्यालयात डाक अदालतपणजी (गोवा) येथे गुरुवारी (दि. २६) गोवा क्षेत्रीय कार्यालयांंतर्गत येणाऱ्या सर्व पोस्ट कार्यालयांतील कर्मचारी, कामकाज, टपाल, स्पीड पोस्ट, कौंटर सेवा, बचत बँक, मनिआॅर्डर याबाबतच्या तक्रारींसाठी डाक अदालतीचे आयोजन केले आहे. ही डाक अदालत पोस्टमास्तर जनरल यांच्यासमोर होणार आहे. यासंबंधी नागरिकांच्या तक्रारी पोस्टल सेवेचे सहायक संचालक राजशेखर भट यांच्या नावे पोस्टमास्तर, गोवा यांच्या नावे दोन प्रतींत पाठवून देण्याचे आवाहन वरिष्ठ अधीक्षक, डाकघर यांनी केले आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर, सिटी पोस्ट, कुरुंदवाड, हेड पोस्ट बावडा, बलभीम बँक पोस्ट कार्यालय, इचलकरंजी पोस्ट कार्यालय, शाहूपुरी पोस्ट, गडहिंग्लज, रेल्वे स्टेशन पोस्ट कार्यालय व शनिवार पेठ पोस्ट कार्यालय अशा दहा कार्यालयांत ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. कोअर बँकिंग प्रणालीमुळे पोस्टाच्या लाखो ग्राहकांना घरबसल्या पोस्टाच्या बँकिंग सेवा मिळणार आहेत. या प्रणालीत प्रत्येक ग्राहकाला आयडी दिला आहे. त्यानुसार हा आयडी देशातील इतर पोस्ट कार्यालयात चालू शकतो. तेथेही आपण व्यवहार करू शकतो. पोस्टाच्या लाखो ग्राहकांना या सेवेचा लाभ होणार आहे.- एस. व्ही. मगदूम, सहायक पोस्टमास्तर, शनिवार पेठ पोस्ट, कोल्हापूर.