शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
4
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
5
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
6
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
7
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
10
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
12
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
13
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
14
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
15
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
16
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
17
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
18
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
19
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

महाडिक-सतेज व मालोजीराजेंना एकत्र आणण्यासाठी बैठक घेणार

By admin | Updated: August 10, 2015 01:07 IST

पी. एन. पाटील : महापालिकेसाठी रणनीती २० आॅगस्टला ठरणार

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्रितपणे लढणे आवश्यक आहे. ते लक्षात घेऊन २० आॅगस्टच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी आमदार महादेवराव महाडिक, माजी मंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची एकत्रितपणे बैठक घेणार असल्याची माहिती कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी दिली. क्रांतिदिनानिमित्त काँग्रेस कमिटीमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण उपस्थित होते. शहराध्यक्ष चव्हाण म्हणाले, महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार निवडीचे अधिकार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने स्थानिक पातळीवर कोणत्याही एका व्यक्तीला दिलेले नाहीत. याबाबत जिल्ह्यातील नेते-पदाधिकारी सामूहिकपणे निर्णय घेतील. उमेदवार हे काँग्रेस कमिटीतच ठरविले जातील. शिवाय प्रदेश चिटणीस सुरेश कुऱ्हाडे यांनी या अनुषंगाने जाहीर केलेल्या मताशी जिल्हा काँग्रेस सहमत नाही. देशात ज्याप्रमाणे क्रांती घडली अशी क्रांती आगामी निवडणुकीमध्ये घडवून महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकाविण्यासाठी काँग्रेसजनांनी कार्यरत राहावे. पी. एन. पाटील म्हणाले, राजीव गांधी जयंतीनिमित्त २० आॅगस्टला काँग्रेसतर्फे ‘सद्भावना दौड’चे आयोजन केले आहे. यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, आमदार पतंगराव कदम, माजी मंत्री रमेश बागवे, सत्यजित देशमुख प्रमुख उपस्थित राहणार आहे. त्यांच्या उपस्थितीत दिंडनेर्ली (ता. करवीर) येथे सकाळी मेळावा होईल. त्यानंतर दुपारी चार वाजता जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होईल. यामध्ये महानगरपालिका निवडणुकीबाबतची रणनीती निश्चित केली जाणार आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस एस. के. माळी, महिला व बालकल्याण समिती सभापती लीला धुमाळ, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)सामूहिकपणे निर्णयमहानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस सर्व ताकदीनिशी उतरणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारी देण्याबाबत सामूहिकपणे निर्णय घेतला जाईल. उमेदवार हे काँग्रेस कमिटीमध्येच ठरविले जातील, अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी दिली.