शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रक रंजना पाटील निलंबित

By admin | Updated: January 5, 2015 00:42 IST

‘विद्यार्थी पास’ गैरव्यवहार : रंकाळा स्टँड येथील प्रकार; प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न

कोल्हापूर : रंकाळा स्टँड येथील ‘विद्यार्थी पास’मध्ये झालेल्या गैरव्यवहाराचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. या प्रकरणात राधानगरी तालुक्यातील एका तरुणाचा सहभाग असल्याची चर्चा सुरू आहे. गैरव्यवहारप्रकरणी रंकाळा एस. टी. स्टँडमध्ये वाहतूक नियंत्रक रंजना कृष्णात पाटील (रा. येळवडे ता. राधानगरी) यांना एस. टी. महामंडळाने निलंबित केले आहे.रंकाळा स्टँड येथे वाहतूक नियंत्रक रंजना पाटील यांच्याकडे विद्यार्थी व कामगार पास देण्याचे काम होते. येथून दर महिन्याला रंकाळा स्टँड येथून ३ हजार ५०० विद्यार्थी पासचा लाभ घेत आहेत. या ठिकाणी कामगारांना ठरावीक रक्कम घेऊन ‘विद्यार्थी पास’ दिले जात होते. हा प्रकार गेल्या वर्षापासून सुरू होता. रंजना पाटील यांच्या कारनाम्याची कुणकुण महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लागली होती. त्यांनी त्या दिशेने तपास सुरू केल्यानंतर पाटील यांचे बिंंग फुटले. काही नोकरदार ‘विद्यार्थी पास’ घेऊन प्रवास करताना आढळले. त्यामुळे त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हे पास रंकाळा स्टँड येथील वाहतूक नियंत्रकांनी दिल्याचे सांगितल्याचे समजते. यासंबंधी अहवाल वरिष्ठांच्याकडे दिला असता त्यांनी तत्काळ वाहतूक नियंत्रक रंजना पाटील यांना निलंबित केले. प्रशासनाने याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. या प्रकरणात केवळ राधानगरी तालुक्यातील लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. पाटील यांना तालुक्यातील एक तरुण मदत करत असल्याची चर्र्चा आहे. त्यामुळे राधानगरी तालुक्यातील एक वजनदार नेता हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा एस.टी.च्या वर्तुळात सुरू आहे.परिसरातीलच व्यक्तीला पासविभागीय वाहतूक नियंत्रक पाटील यांनी आपल्या राधानगरी परिसरात राहणाऱ्या नोकरदारांनाच हेच पास दिल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे, असे समजते. वाहतूक नियंत्रक पाटील या प्रकरणात फक्त एकट्याच आहेत की त्यांना या प्रकरणी आणि कोणी मदत करत होते. याचा तपास होणेही गरजेचा आहे. असा आला प्रकार उघडकीसरंकाळा स्टँड येथे काही विद्यार्थ्यांनी विद्यार्थी पाससाठी अर्ज केला होता. मात्र, येथील वाहतूक नियंत्रक पाटील यांनी त्यांना पास संपलेत, असे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांची तक्रार विद्यार्थ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे केली. त्यांनी सखोल तपास केला असता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत प्राथमिक माहितीनुसार ‘विद्यार्थी पास’मध्ये गैरव्यवहार झाल्याचे दिसते. त्यामुळे रंकाळा स्टँड येथील वाहतूक नियंत्रक रंजना पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत पारदर्शकपणे तपास सुरू असून याबाबत चार दिवसांत अहवाल प्राप्त होऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल- सुहास जाधव (विभाग नियंत्रक)