शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

सरकार पाडू म्हणणाऱ्यांचे वीस आमदार संपर्कात

By admin | Updated: February 20, 2017 00:59 IST

चंद्रकांतदादा पाटील : ‘बिद्री’ची निवडणूक अजून दोन वर्षे नाही

गारगोटी : सरकार पाडून मध्यावधी निवडणुकीची धमकी देणाऱ्या पक्षाचे वीस-वीस आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे सरकार पडण्याची भीती नाही. परंतु ज्यांनी ज्यांनी ऊस खाल्ला आहे, अशा सर्वांचा भ्रष्टाचार मुळासकट उपटून काढण्यात येणार आहे, असा घणाघात महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. गारगोटी येथील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचार सांगतेप्रसंगी हुतात्मा क्रांतिसिंह नाना पाटील चौकात घेण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई होते.ज्या बिद्री कारखान्याच्या चिमणीभोवती या तालुक्याचे राजकारण फिरत आहे, त्या कारखान्याची निवडणूक किमान दोन वर्षे तरी होणार नाही. सतरा हजार सभासदांची तपासणी करण्यासाठी तेवढा वेळ लागणारच आहे. प्रशासकांमुळे टनाला दोनशे रुपये जादा दर मिळाल्याने शेतकरीही निवडणुकीपेक्षा प्रशासक बरे म्हणत आहेत, असेही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. केंद्रात भाजप सरकारच्या अनेक लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी योग्य रीतीने होण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भाजपची सत्ता आवश्यक आहे, म्हणून भाजप आणि भाजप पुरस्कृत उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असेही ते म्हणाले.यावेळी ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई म्हणाले, गेली पस्तीस वर्षे प्रलंबित असणारा सोनवडे-घोडगे घाट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अवघ्या दोन महिन्यांत वन खात्याच्या मंजुरीसह भरघोस निधी मंजूर करून मार्गी लावला. अल्पावधीतच या घाटाचे काम मार्गी लागले. यावेळी योगेश परुळेकर, देवराज बारदेस्कर, प्रवीणसिंह सावंत यांनी मनोगते व्यक्त केली. नाथाजी पाटील म्हणाले की, पक्षाचा झेंडा गुंडाळून ठेवून राधानगरीत काँग्रेस, आजरा तालुक्यांत ताराराणी आणि भुदरगड तालुक्यात पक्षच नाही अशी दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांनी आमदार असल्याचा टेंभा मिरवू नये. यावेळी अलकेश कांदळकर, धनाजी मोरूस्कर, शक्तिजित पोवार, युवराज पाटील, नामदेव चौगले, अमर पाटील, दिलीप केणे, निवास देसाई, नामदेव कांबळे, दिगंबर देसाई यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी देवराज बारदेस्कर यांनी काढलेल्या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले होते.