शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

कर्तव्याने घडतो माणूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:03 IST

इंद्रजित देशमुख कधीतरी सकाळच्या पहाटप्रहरी प्रवास करत असताना सुधीर फडके बाबूजींनी गायिलेली कविवर्य मनोहर कवीश्वरांची ‘कर्तव्याने घडतो माणूस जाणून ...

इंद्रजित देशमुखकधीतरी सकाळच्या पहाटप्रहरी प्रवास करत असताना सुधीर फडके बाबूजींनी गायिलेली कविवर्य मनोहर कवीश्वरांची ‘कर्तव्याने घडतो माणूस जाणून घे पार्था’ ही रचना कानावर पडते आणि मन सखोल चिंतनाच्या गर्तेत घिरट्या घालू लागतं. भगवान जगातील उच्चतम अशा कर्तव्य प्रतिपालनाबद्दल झालेल्या या गीतातील संवादातून मानवाच्या बहुउच्च विकसनासाठी या गीतात कर्तव्याला दिलेली प्राधान्यता खरोखर वाखाणण्यासारखी आहे.लहानपणी आम्हाला चिऊ-काऊच्या गोष्टी सांगताना चिऊचं आपलं घरटं बांधताना असणारं असीम प्रयत्नवादी धैर्य आम्ही त्यावेळी नुसतं ऐकायचो, पण आता त्या चिऊताईच्या कर्तव्यबुद्धिबद्दल थोडीशी उमग येतीये आणि संपूर्ण आयुष्यभर पुरेल असा एक देखणा संदेश आमच्या जीवनाला देऊन जायचा. त्यातूनच मानवी मनावर कर्तव्य जोपासण्याठीचा एक देखणा संस्कार होतोय. तसं पाहिलं तर हालचाल हे जिवंतपणाचं सगळ्यात मोठं दार्शनिक लक्षण आहे. याचाच सामान्य अर्थ असा की जिवंत असण्यासाठी जीविताची हालचाल होणं खूप गरजेचं आहे. त्या हालचालीला जोपासणं म्हणजेच कर्तव्यप्रवण राहणं होय. आमच्या संत साहित्यात बऱ्याच ठिकाणी याच कर्तव्यप्रवणतेला विविध अंगांनी उत्तेजना दिलेली आहे. कधी आमच्या ज्ञानेश्वर माउलींनी 'उद्यमाचेनी मिसे’ असे सांगून तर कधी तुकोबारायांनीभिक्षापात्र अवलंबणे।जळो जिणे लाजिरवाणे।। असे म्हणून, कधी नाथबाबांनी सांगितल्याप्रमाणेपक्षी अंगणी उतरती। ते का गुंतोनिया राहती।। असं सांगून तर कधी संत कबिरांच्या ‘करणी करेगा तो नर नारायण बन जायेगा’ या वाणीतून. या आणि अशा अनंत प्रकारांनी या सर्व संतांनी आम्हाला कर्तव्यबुद्धी जोपासायलाच सांगितलं आहे. एकूणच काय कर्तव्य जोपासना हीच साधकांच्या जीवनातील एक महत्त्वाची पायरी आहे म्हणूनच भगवान श्रीकृष्ण अर्जुन नामक आपल्या लाडक्या शिष्याला ‘कर्म करणं हा तुझा अधिकार आहे’ असं सांगतात, तर त्याच बाबतीत आमचे ज्ञानोबारायतया सर्वात्मका ईश्वरा।स्वकर्म कुसुमांची वीरा।पूजा केली होय अपारा।तोषालागीं।। असं सांगतात.या सर्व महात्म्यांची ही मतं आमच्या कर्तव्यबुद्धीला चालनाच देतात आणि यातूनच आमच्या मनात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या कर्म की दैव या दुमताचे उत्तर सापडते. याचसाठी आमच्या संत मालिकेत जे संत महात्मे झाले ते सगळेचजण आपापल्या कर्तव्यात रमून त्या सर्वसाक्षी परमात्म्याची आराधना करीत होते. म्हणूनच तुकोबाराय व्यापार, नामदेवराय शिंपीकाम, गोरोबाकाका कुंभारकाम, नाथराय आपलं कुलकर्णीपद, सावताबाबा आपली शेती, कबिरांचं कपडे विणणं, जनाबार्इंचं जात्यावर दळणं, रोहिदास महाराजांचं चर्मकाम,चोखोबारायांचं जनावरं राखणं इतकंच कायसजन कसाई यांचं मांस विकणं अशी ही सारी संत मंडळी कोणत्याही कर्तव्याचा त्याग न करता प्रभू आराधनेत रमलेली होती आणि सरतेशेवटी ही सारी मंडळी आयुष्याच्या खºया अर्थापर्यंत पोचलीदेखील होती. या सर्वांच्या या कृतींचा मागोवा घेतला की आम्ही काय करायला हवं याचं निर्देशन आपोआप आम्हाला मिळतं. कर्तव्यावाचून केलेला परमार्थ म्हणजे अपुरा परमार्थ होय. कर्तव्यविरहित जगणं कधीच भक्तांना खºया भक्तीपथापर्यंत पोचवू शकत नाही. कारण ज्यांना आमचे आराध्य समजतो, असे राम-कृष्णादी ईश्वरी पुरुष देखील इथे आपल्या कर्तव्यपूर्ततेत कधीच कमी पडले नाहीत. त्यांनीदेखील आपापली कर्तव्ये अतिशय कठीण आणि विपत्तीजन्य वातावरणात पार पाडली. मग आम्ही जरत्यांचा अनुनय करत असू तर आम्हीही कर्तव्यधार्जिणे व्हायला नको का! मुळात ही सगळी दैवीरत्नेअसीम कर्तृत्वाच्या बळावरच नावारूपाला आलेली आहेत.लोखंडी तुकड्याला परीसस्पर्श झाला की त्याचं सोन्यात रूपांतर होतं असं म्हणतात. आमच्या या निस्तेज जीवनात आम्ही कर्तव्यपूर्तीच्या परीसाकडे झोकून दिलं की आम्हीही तेजस्वीच होऊ आणि अवघ्यांना आपल्या तेजोवलयाने तेजस्वी करू शकू. मात्र, आम्ही ती कर्तव्यबुद्धी जोपासायला हवी, ती जोपासण्याचं बळ आणि धैर्य आपण सर्वजण प्राप्त करूया एवढीच अपेक्षा.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत)