शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

‘कनेक्टिव्हिटी’ वाढविणार

By admin | Updated: March 5, 2015 00:14 IST

अशोक भोईटे : ‘लोकमत’च्या शहर कार्यालयाला सदिच्छा भेट

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील चर्चासत्रे, व्याख्याने समाजासाठी उपयुक्त ठरणारी असतात. मात्र, विद्यापीठात ती होत असल्याने ती अधिकतर लोकांपर्यंत पोहोचत नसल्याची वस्तुस्थिती आहे. ती लक्षात घेऊन चर्चासत्रे, व्याख्याने, कार्यक्रम शहरात घेण्याचे नियोजन आहे. त्याद्वारे विद्यापीठाची कोल्हापूरकरांशी ‘कनेक्टिव्हिटी’ वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी येथे बुधवारी सांगितले. ‘लोकमत’च्या शहर कार्यालयाला त्यांनी बुधवारी सदिच्छा भेट दिली. शिवाय त्यांनी विद्यापीठाच्या नव्या उपक्रमांबाबत संवाद साधला. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्य बातमीदार विश्वास पाटील, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर, वरिष्ठ लघुलेखक प्रशांत झंपले उपस्थित होते.डॉ. भोईटे म्हणाले, विद्यापीठातील कार्यक्रम हे शैक्षणिक असतात, असा अनेकांचा समज झाला आहे. मात्र, विविध विद्याशाखांद्वारे होणारी चर्चासत्रे, परिषदा, व्याख्याने यांचे विषय समाजाशी संबंधित असतात; पण हे कार्यक्रम विद्यापीठात होत असल्याने ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. ते लक्षात घेऊन समाजासाठी उपयुक्त असलेले कार्यक्रम कोल्हापूर शहरातील राजर्षी शाहू स्मारक भवन, करवीर नगर वाचन मंदिर, आदी ठिकाणी घेण्याचे नियोजन आहे. त्यातून शहरवासीयांशी विद्यापीठ जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच एकांकिका, नाटके विद्यापीठात घेतली जातील. विद्यापीठातील संशोधन, विविध उपक्रम समाजासाठी कसे उपयुक्त ठरतील, हे लक्षात घेऊन त्यांचे नियोजन केले जाईल.‘लोकमत’चे पाठबळविद्यापीठातील अनेक उपक्रम राज्यात पोहोचवून आम्हाला बळ देण्याचे काम ‘लोकमत’ने केले आहे. शिवाय त्रुटी दाखवून विद्यापीठाला जागेदेखील केले असल्याचे डॉ. भोईटे यांनी सांगितले. ते म्हणाले, समाजातील प्रत्येक घटकांसाठी ‘लोकमत’ राबवीत असलेले विविध उपक्रम उल्लेखनीय आहेत. विद्यापीठाच्या यशस्वी वाटचालीसाठी ‘लोकमत’ने पाठबळ द्यावे.