शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

हत्येचे कनेक्शन संकेश्वरमार्गे आजरा?

By admin | Updated: September 18, 2015 00:55 IST

महाराष्ट्र, कर्नाटक या दोन राज्यांतील साध्या वेशातील पोलीस संकेश्वरात पहाटेपासून तळ ठोकून होते. त्याच्या नातेवाइकांची कसून चौकशी केली जात आहे.

भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर--ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचे कनेक्शन संकेश्वर (कर्नाटक)मार्गे आजरा येथे असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी बुधवारी पोलिसांनी सांगलीतून अटक केलेल्या संशयित समीर गायकवाडचा गोतावळा संकेश्वर आणि आजरा येथे आहे. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक या दोन राज्यांतील साध्या वेशातील पोलीस संकेश्वरात पहाटेपासून तळ ठोकून होते. त्याच्या नातेवाइकांची कसून चौकशी केली जात आहे. कन्नड साहित्यिक एम. एम. कलबुर्गी यांची हत्या झाल्यानंतर कर्नाटक पोलीस मारेकऱ्यांच्या शोधात आहेत. पानसरेंचा संशयित सापडल्याने कर्नाटक पोलिसांचे तपासाचे केंद्रही संकेश्वरच बनले आहे. समीरची आई शांता यांचे माहेर संकेश्वरातील जाधव कुटुंबातील आहे. संकेश्वरातील गांधी चौकात त्यांचे वडिलोपार्जित सायकल दुरुस्तीचे दुकान आहे. आकाशवाणी केंद्रात नोकरी लागल्यानंतर वडील विष्णू सांगलीत स्थायिक झाले. समीरला सचिन व संदीप असे दोन भाऊ आहेत. समीर हा सर्वांत लहान आणि भांडखोर स्वभावाचा होता. त्यामुळे त्याला शिक्षणासाठी संकेश्वरात मामाकडे ठेवण्यात आले. त्याने प्राथमिक, माध्यमिक शिक्षण संकेश्वरातच पूर्ण केले. त्याच्या दोन मावशा व मामा सनातन संस्थेचे कट्टर प्रचारक आहेत. त्यामुळे समीरला ‘सनातन’चे बाळकडू आजोळीच मिळाले. दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर मामाच्या सायकल दुकानाशेजारीच छोटेसे इलेक्ट्रॉनिक वस्तू विकण्याचे दुकान त्याने सुरू केले. तेथेही जम बसला नाही; त्यामुळे त्याने सांगली गाठली.दरम्यान, समीरचे दोन मामा १९९६ च्या सुमारास आजरा येथे गेले. तेथे एका मामाने सुरुवातीला काही दिवस एका पोलिसाच्या मदतीने खासगी सावकारी केली. मात्र, पोलीस आणि त्याच्यात काही कारणामुळे बिनसले. त्यामुळे खासगी सावकारी बंद करून मामाने आजऱ्यातील शिवाजीनगरात नबापूर भागात सायकल दुरुस्तीचे दुकान सुरू केले.आजऱ्याला आलेल्या दुसऱ्या मामाचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. जवळचा गोतावळा असल्यामुळे संकेश्वर आणि आजरा येथे समीरचे नेहमी येणे-जाणे होते. तीन वर्षांपूर्वी आजरा येथील मामाच्या डॉक्टर मुलीशी समीरचे लग्न झाले. मात्र, दोघांमध्ये मतभेद झाले. त्यामुळे पत्नी गोवा येथे राहते, तर समीर सांगली येथे राहत होता. आजऱ्यातील समीरचा मामाही सनातन संस्थेचा कट्टर, सक्रिय कार्यकर्ता होता. जहाल हिंदुत्ववादी लोकांच्या ग्रुपमध्ये तो राहतो. ‘सनातन’च्या मुखपत्र वितरणाची जबाबदारी तो अनेक वर्षांपासून पार पडतो. अशा प्रकारे समीरचे बहुतेक नातेवाइक सनातन संस्थेशी संबंधित आहेत. पानसरे यांच्या हत्या प्रकरणात त्याला अटक केल्यानंतर संकेश्वर आणि आजरा येथे खळबळ उडाली. आजरा येथील सायकलचे दुकान असलेला त्याचा मामा पसार झाला असून, आजूबाजूचे लोक मात्र तो गणपतीला संकेश्वरला गेल्याचे सांगत आहेत.हत्येनंतरही वावरअ‍ॅड. पानसरे यांच्या हत्येनंतरही समीर अनेकवेळा संकेश्वर व आजरा येथे येऊन गेल्याचे सांगितले जात आहे. संकेश्वरात अनेक वर्षांपासून सनातन संस्थेचे कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांमध्ये समीर, त्याच्या दोन मावशा, मामा असायचे. एक मावशी गोवा आणि दुसरी मिरज येथील ‘सनातन’च्या गोटात अधिक सक्रिय होती.