कोल्हापूर : वीज मंडळाच्या तीनही कंपन्यांतील विद्युत श्रमिक काँगे्रसच्या केंद्रीय कार्यकारिणीची सभा कोल्हापूर येथे नुकतीच पार पडली़ सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे प्रांतीय अध्यक्ष भाऊराव सावरकर (नागपूर) हे होते़ या सभेत वीज ग्राहकांच्या प्रमाणात वीज कर्मचारी नेमणे, शाखा कार्यालय, उपविभाग कार्यालयांची निर्मिती करणे, किरकोळ कारणावरून कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई न करणे, तसेच मीटर वाचन, वीज बिल वसुली ठेकेदारांऐवजी कंपनीतर्फे करण्यात यावी, तीनही कंपनीतील शिकाऊ कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घेण्यात यावे, यासह विविध ठराव संमत करण्यात आले़ या प्रश्नाबाबत कंपनीच्या मुख्य, तसेच संबंधित कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णयही घेण्यात आला़ यावेळी कर्मचाऱ्यांची नियुक्ती, तसेच वर नमूद केलेल्या विविध प्रश्नांवर वीज मंडळातील कार्यरत असलेल्या आठ संघटनांच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. याची कार्यवाही करण्याबाबत केंद्रीय कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने समंती दिली.या सभेस संघटनेचे प्रांतीय महासचिव अनिल तराळे (नागपूर), काशिनाथ गिरीबुवा (कोल्हापूर), शंकरराव पाटील (इचलकरंजी), संजय कांबळे (कोल्हापूर), किसन जगताप (सांगली), अनुराधा भोसले (कोल्हापूर), आदींसह कार्यकारिणीचे राज्यभरातील ५१ सदस्य उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
विद्युत श्रमिक काँग्रेस कार्यकारिणीची सभा
By admin | Updated: November 12, 2014 00:27 IST