शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

सतेज पाटलांच्या कुरघोड्यांना कॉँग्रेसचे पाठबळ

By admin | Updated: October 13, 2015 00:39 IST

स्वरूप महाडिक : महाडिकांना संपविण्याचा प्रयत्न केल्यानेच ताराराणी आघाडी पुनर्जीवित

कोल्हापूर : राजकारणातील विरोध समजू शकतो; पण व्यक्तिगत पातळीवर उतरून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सत्तेचा आधार घेऊन महाडिक कुटुंबीयांना सातत्याने त्रास दिला. महादेवराव महाडिक यांना जिल्ह्यातून संपवू पाहणाऱ्यांना काँग्रेसश्रेष्ठींनी पाठबळ दिले. अशा काँग्रेसचा महापालिका निवडणुकीत प्रचार कसा करायचा? यातूनच ‘ताराराणी’ पुनर्जीवित केली. याला राज्य व जिल्हा पातळीवरील कॉँग्रेसचे नेतेच जबाबदार असल्याचे शरसंधान ताराराणी आघाडीचे प्रमुख स्वरूप महाडिक यांनी ‘लोकमत’शी बोलताना विरोधकांवर साधले. महाडिक यांचे नाव वगळून मार्केटमध्ये ‘ताराराणी’ आघाडीचे अस्तित्व शून्य असून, महादेवराव महाडिक यांच्या छत्रछायेखालीच ‘ताराराणी’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वरूप महाडिक म्हणाले, आमदार महादेवराव महाडिक यांनी स्वत:च्या व्यवसायातील पैशांतून राजकारण केले. त्यांच्यामुळेच सामान्य माणसाला राजकारणात मानाचे स्थान मिळाले; पण दुर्दैवाने त्यांची नकारात्मक बाजू समाजासमोर आणण्याचा काही मंडळी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या भूमिकेमागील कारणे तपासण्याची खरी गरज आहे. आमदार महाडिक हे पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढविताना, त्यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी प्रयत्न केले. महाडिक कुटुंबीयांचे फायदे घ्यायचे आणि महाडिक ज्यावेळी अडचणीत असतील, त्यावेळी त्यांच्यावर टीका करणारी प्रवृत्ती जिल्ह्यात वाढली आहे. गत विधानसभा निवडणुकीत महादेवराव महाडिक यांचा अपमान केला. राजकारणात विरोधाला विरोध समजू शकतो; पण तो व्यक्तिगत पातळीपर्यंत न्यायचा नसतो. तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांनी आमच्या उद्योगधंद्यांना टार्गेट केले. याबाबत आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कऱ्हाडमध्ये जाऊन गृहराज्यमंत्र्यांना आवरा, अशी विनंती केली होती. परंतु, महाडिक यांचे जिल्ह्यातील राजकीय वर्चस्व संपवू पाहणाऱ्यांना काँग्रेसच्या नेत्यांनी पाठबळ दिले. मग अशा काँग्रेसचा प्रचार आम्ही कसा करायचा? असा सवाल स्वरूप महाडिक यांनी केला. आमदार महाडिक हे स्वयंभू नेते आहेत. ताराराणी आघाडीची पुनर्बांधणी करताना त्यांचा सल्ला घेतला. आजपर्यंत आमदार महाडिक यांना संघर्षातूनच सर्व पदे मिळाली आहेत. जिल्हा बॅँक असो किंवा विधानपरिषद निवडणुक प्रत्येकवेळी विरोध करण्यात आला. मागील लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांना उमेदवारी देऊ नका म्हणणारे कोण होते? त्यावेळी उमेदवारी दिली असती तर ही वेळ आलीच नसती. जे आज महाडिकांना विरोध करत आहेत, त्यांच्यावर किती उपकार केले हे तरी मागे वळून त्यांनी पाहावे, असेही स्वरूप महाडिक यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक सुनील मोदी उपस्थित होते. सतेज पाटील आमदारही झाले नसते!आमदार महादेवराव महाडिक यांनी अनेकांना राजकारणात आणून मोठे केले; पण ज्यावेळी महाडिक यांना मदत करण्याची वेळ येते, त्यावेळी अनेकजण उलटले. महाडिक यांनी आशीर्वाद दिला नसता तर सतेज पाटील आमदार झाले नसते, याचे भानही या मंडळींनी ठेवावे, असा इशारा स्वरूप यांनी दिला.