शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

इंधन, गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात येथील काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी निदर्शने करण्यात आली. येथील पार्वती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात येथील काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी निदर्शने करण्यात आली. येथील पार्वती टॉकीजजवळील शेतकरी संघाच्या पेट्रोल पंपासमोर ही निदर्शने झाली. माजी उपमहापौर संजय मोहिते यांनी क्रिकेटरच्या गणवेशात येत पेट्रोलच्या दराने सेंच्युरी पार केल्याकडे लक्ष वेधले. काँग्रेसचे नेतेे आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

पेट्रोलने शंभरी पार केली आहे. डिझेलचे दरदेखील सातत्याने वाढत आहेत. गॅसचीही दरवाढ प्रचंड प्रमाणात झाली आहे. या दरवाढीविरोधात आक्रमक झालेल्या काँग्रेसने रस्त्यावर उतरत मोदी सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. पालकमंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. ‘मोदी सरकार चले जाव’, ‘मोदी सरकार म्हणजे महागाईचा भस्मासूर’ असे फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले.

यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झालेत. सर्वसामान्य, गरीब आणि हातावरचे पोट असणाऱ्यांना दोनवेळचे जेवण मिळणेदेखील मुश्कील झाले आहे. अशा काळातच इंधन, गॅस दरवाढीचे संकट निर्माण झाले आहे. यामुळे मोदी सरकारने इंधन आणि गॅस दरवाढ मागे घ्यावी.

निदर्शनावेळी माजी महापौर नीलोफर आजरेकर, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, संध्या घोटणे, सागर चव्हाण, सचिन चव्हाण, तौफिक मुल्लाणी, सुलोचना नायकवडे, संजय पवार-वाईकर, ॲड. गुलाबराव घोरपडे, बाळासाहेब सरनाईक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट

बस्स करा जनतेची लूटमार

लुटेरी मोदी सरकार, पेट्रोल हुआ सौ पार, पेट्रोल महंगाई से जनता बेहाल, मोदी के पूंजीपती मित्र मालामाल, पेट्रोल, डिझेल शंभर पार, मोदी बस्स करा जनतेची लूटमार अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.