शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक एकवटले

By admin | Updated: May 13, 2016 00:59 IST

इचलकरंजी पालिका : कृष्णा नळ पाणी योजना, रस्त्याच्या कामासाठी विशेष सभेची मागणी

इचलकरंजी : शहरास पाणी पुरविणाऱ्या कृष्णा नळ योजनेची दाबनलिका बदलण्याचे २७ कोटी रुपयांचे काम जीवन प्राधिकरणाऐवजी आणि शहर अंतर्गत रस्ते करण्याची १५ कोटी रुपयांची कामे शासनाच्या बांधकाम खात्याऐवजी नगरपालिकेच्यावतीने केली जावीत, यासाठी निर्णय घेण्यासाठी पालिकेची तातडीने विशेष सभा बोलवावी, अशा आशयाची मागणी राष्ट्रीय कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या ३३ नगरसेवकांनी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्याकडे केली आहे.ही दोन्ही कामे नगरपालिकेऐवजी शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करून घेण्याचा निर्णय आमदार सुरेश हाळवणकर यांनी घेतला आहे. त्याप्रमाणे शासनदरबारी निर्देश झाले असल्यामुळे त्याच्या विरोधात पाणीपुरवठा सभापती दिलीप झोळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर सुनावणी झाली असताना मुंबई उच्च न्यायालयाने हा विषय नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवून सभागृहाने मंजूर केलेला प्रस्ताव न्यायालयात सादर करावा, असे आदेश दिले आहेत. याबाबतची उच्च न्यायालयातील सुनावणी १३ जूनला होणार आहे.या पार्श्वभूमीवर गुरुवारी राष्ट्रीय कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील, उपनगराध्यक्ष महावीर जैन, गटनेते बाळासाहेब कलागते, सभापती दिलीप झोळ, नगरसेविका बिस्मिल्ला मुजावर, बांधकाम सभापती लतिफ गैबान, राष्ट्रवादीचे नगरसेवक अशोकराव जांभळे, बंडोपंत मुसळे, आदींनी सभा बोलाविण्याविषयीचे निवेदन नगराध्यक्षा बिरंजे यांना दिले.बंडखोर व कारंडे गटाच्या स्वाक्षऱ्या नाहीतमहाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ कलम ८१ (२) नुसार विशेष सभा बोलाविण्यासाठी ३३ नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनावर कॉँग्रेसच्या ३२ पैकी २५ नगरसेवकांच्या सह्या आहेत, तर राष्ट्रवादीच्या ११ पैकी आठ नगरसेवकांच्या सह्या आहेत. मात्र, कॉँग्रेसमधील बंडखोर गट व राष्ट्रवादीतील कारंडे गट यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत.इचलकरंजीच्या नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना विशेष सभा बोलविण्याचे निवेदन देताना कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील. यावेळी लतिफ गैबान, दिलीप झोळ, बंडोपंत मुसळे, अशोकराव जांभळे, बाळासाहेब कलागते, महावीर जैन व बिस्मिल्ला मुजावर उपस्थित होते.