शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

वाहन पार्किंगमुळे बांबवडे बाजारात कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:37 IST

बांबवडे : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील गुरुवारी भरणारा आठवडी बाजार हा नवीन मंडईत भरत असला तरी विक्रेते कोल्हापूर-रत्नागिरी ...

बांबवडे : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील गुरुवारी भरणारा आठवडी बाजार हा नवीन मंडईत भरत असला तरी विक्रेते कोल्हापूर-रत्नागिरी या मार्गावर बसतात. विक्रेते मनाला येईल तसे बसत असल्याने बाजारादिवशी पिशवी व सरूड मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते.

शाहूवाडी तालुक्यातील मुख्य बाजारपेठेपैकी बांबवडे ही एक बाजारपेठ आहे. या बाजारपेठेशी शाहूवाडीसह पन्हाळा व शिराळा तालुक्यांतील गावांचा संपर्क येतो. यापूर्वी आठवडी बाजार जनावरांचा दवाखाना ते बाजारपेठेपर्यंत व बस स्थानक परिसरात विखुरलेला असायचा. आता हा बाजार नवीन बांधलेल्या भाजी मंडईत भरत आहे. तरीही नियोजन नसल्याने थेट रस्त्यावरच आला आहे. नियोजनातील विस्कळीतपणामुळे वाहतुकीची कोंडी ही सामान्य माणसांची डोकेदुखी ठरली आहे.

भाजी मंडईकडे जाणाऱ्या पिशवी रस्त्यावर बाजार भरतो. हा रस्ता मुळातच अरुंद आहे. यामध्येच रस्त्याच्या दुतर्फा काही विक्रेते बसलेले असतात. ही परिस्थिती मुख्य चौक ते शिराळकर हॉटेलपर्यंत आहे. सरुड रस्त्यावर यापेक्षा वेगळी अवस्था नाही. ऊस वाहतूक, शिराळा, कोकरूडकडून येणारी अवजड वाहने वळवण्यासाठी अपुरी जागा, यातच चौकात उभी असलेली खासगी प्रवासी वाहने यामुळे हा रस्ता महामार्गावरील कोंडीत भर टाकतो.

वाहन पार्किंगची गचाळ व्यवस्था ही फार मोठी समस्या आहे. बाजारपेठेत येणाऱ्या लोकांना वाहने उभी करण्यासाठी स्वतंत्र अशी जागा नाही. त्यामुळे कोणीही येतो, त्याला वाटेल तिथे व तशी वाहने पार्किंग करून आपल्या कामाला निघून जातो. यासाठी पार्किंगची व्यवस्था सम व विषम तारखांना करणे गरजेचे आहे. (उद्याच्या अंकात कोपार्डे बाजार)

हा होऊ शकतो पर्याय....

बांबवडे बाजारात वाहन पार्किंग ही मोठी समस्या आहे. ग्रामपंचायतीने त्याचे नियोजन केले तर बऱ्यापैकी ताण कमी होऊ शकतो. बसस्थानक परिसरात उभी असणारी खासगी प्रवासी वाहने कोल्हापूरकडे जाणाऱ्या अंबिरा पुलाच्या पलीकडे पार्किंग करणे सोयीचे ठरू शकते. बोरगे मिल व मलकापूरकडे जाणारी वाहने जनावरांचा बाजार किंवा ग्रामपंचायतीसमोर पार्किंग करावीत. पिशवी रस्त्यावरील किरकोळ विक्रेत्यांना भाजी मंडईच्या शेजारी बसवले तर बाजार सुटसुटीत होईल.

कोट-

बाजारपेठ सुरळीत चालावी, लोकांना त्रास होऊ नये, वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटावा, यासाठी रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या विक्रेत्यांची स्वतंत्र व्यवस्था करणार आहे. त्याचबरोबर एसटी महामंडळ, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून मार्ग काढू.

- विष्णू यादव (सदस्य, ग्रामपंचायत)

फोटो- बांबवडे बाजार रस्त्यावर आल्याने वाहतुकीची अशी कोंडी होते. (फोटो-२२०२२०२१-कोल-बांबवडे)